सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे पुणे नगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये डॉक्टर महिलेचा जागीच मृत्यू झाला तर त्या महिलेचे पती गंभीर जखमी झालेले आहेत, डॉक्टर सोनाली मच्छिंद्र खैरे असे मृत महिलेचे नाव आहे,
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर कैलास बाळासाहेब बांदल यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, शिक्रापूर मधील खैरे हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर मच्छिंद्र खैरे आणि त्यांच्या पत्नी सोनाली खैरे हे दोघे आज बुधवारी (ता 15) नगरच्या दिशेने जात असताना, पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर हद्दीतील साई सहारा पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी गेल्यानंतर माघारी येताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रकची कारला धडक बसल्याने हा अपघात झाला, अपघाताची तीव्रता एवढी जबर होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंबून आत मध्ये गेला, कारच्या डाव्या बाजूच्या सीटवर बसलेल्या डॉक्टर सोनाली खैरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर डॉक्टर मच्छिंद्र खैरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात ट्रक नंबर MH 12 QG7447 चालक पवन भगवान साठे (वय 25 राहणार किनी, तालुका जळगाव,जिल्हा बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, डॉक्टर दांपत्याने आपल्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून शिक्रापूर परिसरात चांगली ओळख तयार केली होती, या घटनेची माहिती मिळाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे, पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करत आहेत,
पुणे नगर महामार्गावर बेशिस्त वाहन चालक, वाहनांचा अति वेग यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत, लोकांचे प्राण जात आहेत, वाघोली पासून शिरूर पर्यंत संबंधित महामार्गावर अनेक समस्या आहेत, चौकामध्ये सिग्नल बसवणे, सूचनाफलक बसवणे, वाहतूक पोलिसांची नियुक्ती, बेशिस्त वाहन चालकांना चाप, याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले असून यासंबंधी नागरिक व प्रवासी वारंवार मागणी करत आहेत, संबंधित खाते अजून किती अपघात पाहण्याची वाट पाहत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे,