संतदर्शन , स्पर्श , प्रसाद कृपेने सुख समाधान मिळते - हभप ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली )

Bharari News
0
सणसवाडी प्रतिनिधी
        संतदर्शन, स्पर्श ,प्रसाद , कृपाशिर्वादाने सुख समाधान प्राप्त होते , असे विचार हभप ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी पिंपळनेर येथील अखंड हरीनाम सप्ताहातील काल्याचे दिवशीचे किर्तनात मांडले . संत निळोबाराय महाराजांचे २७० व्या समाधी सोहळ्याप्रित्यर्थ आयोजीत गाथा पारायण व हरीनाम सप्ताहाचे आयोजन होते .     
यावेळी  परिसरातील राळेगणसिद्धी ,वडूले , पानोली ,गांजी भोयरे ,जवळा ,राळेगण थेरपाळ, निघोज , गटेवाडी , जातेगाव ,वाडेगव्हाण ,पारनेर , चिंचोली मोराची, 'नेपत्ती आधी१५० वर गावच्या दिंड्या वारकरी तंबू ठोकून सप्ताहभर उपस्थीत होते . प्रत्येक तंबूमध्ये किर्तन प्रवचन भजनाचा गजर नित्य चालू होता . सप्ताहात पहाटे ४ते ६ काकड आरती , ८ ते ११ गाथा पारायण, ११ ते १२ निळोबाराय गौळणी व भजन , ३ ते ४ नामजप , सायं ४ते ५ हरिपाठ , रात्री ७ ते ९ किर्तन, नंतर महाप्रसाद व भजन जागराचे आयोजन होते .   
'हात ठेवुनी मस्तकी , देवुनी प्रसाद केले सुखी ' या निळोबारायाचे अभंगावर कदम महाराजांनी प्रबोधन केले . कदम महाराजांचा सन्मान संत निळोबाराय महाराजांचे वंशज मकाशीर महाराजांचे हस्ते करणेत आला. सप्ताहामध्ये ह भ प बाळकृष्ण महाराज दळवी , (श्रीगोंदा )भाऊसाहेब महाराज आव्हाड , ( दहीगाव   -नगर ) नारायण महाराज जाधव ( पारनेर ) एकनाथ महाराज चतर शास्त्री (कान्हूर पठार ) डॉ . विकासानंद महाराज मिसाळ (अहमदनगर ) सोपान काका महाराज टेंभुकर ( पंढरपूर ) रामभाऊ महाराज राऊत ( गंगापूर ) पांडुरंग महाराज घुले (देहू ) यांची किर्तन सेवा झाली . दिंडी सोहळा प्रमुख अशोक सावंत व पिंपळनेर ग्रामस्थानी महाराज , वारकरी व गायक मंडळीचा सत्कार केला . पी आय . बळब यांनी दिंडी सोहळ्यात वारकर्‍यांचे शिस्तीचे कौतुक केले . उप जिल्हाधिकारी पाटील यांनी आभार मानले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!