लोणी काळभोर प्रतिनिधी
लोणी काळभोर (ता.हवेली) खुणाची सुपारी घेणारे व खूनच करणारे लोणी काळभोर पोलिसांचा सतर्कतेमुळे अटकेत आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन ने दाखवीलेल्या सतर्कतेमुळे, सुपारी देऊन कुविख्यात टोळीकडुन होणारे साक्षीदारांचे खुनाचा कट उधळला व दोघांचा जिव वाचला.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन चे हद्दीमध्ये सन २०२१ मध्ये संतोष जगताप व त्याचा अंगरक्षक यांचा खुन भर रस्त्यामध्ये गोळीबार करुन करणेत आला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोरील गोळीबारामध्ये तीघांचा जिव गेला होता. सदर घटनेचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस ठाणेस संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चेकलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील अनेक साक्षीदारांपैकी महत्वाचे साक्षीदारांना संपविण्याचा कट संतोष जगताप खुन खटल्यातील मुख्य आरोपींनी शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आल्यानंतर त्यांचे जवळचे मित्रांना (रेकॉर्डवरील गुन्हेगारांना) काही लाख रुपयांची सुपारी देऊन रचला होता.
सदरची बातमी लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील पोलीसांना मिळाली होती. त्यावर मागील काही दिवसांपासुन सदर बातमीचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस आरोपीतांचा शोध घेत होते.. दि. २८/०१/२०२३ रोजी लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे पो. शि. निखील पवार यांना मिळालेल्या खात्रीशिर बातमीवरून लोणीकाळभोर पोलीस स्टेशन ने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली दत्तवाडी रोड, सरकारी दवाखान्याजवळ ऊरुळीकांचन, पुणे याठिकाणी सापळा रचुन अग्निशस्त्र व तिक्ष्ण हत्यारासह दोन आरोपींना शिताफीने पकडले. सदर सापळा कारवाई दरम्यान आरोपींचे अंगझडतीमध्ये त्यांचेकडुन एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, एक धारदार चाकु अशी घातक हत्यारे जप्त करणेत आली आहेत. सदर प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाणेस हत्यार कायदा कलम ३ सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन त्यामध्ये आजपावेतो आरोपी नामे १) आशिष अनिल वरगडे वय २२ वर्षे रा. आश्रमरोड, उरुळीकांचन, पुणे २) उध्दव राजाराम मिसाळ वय ४५ वर्षे रा. दत्तवाडी, उरुळीकांचन, पुणे ३) सुरज सतिष जगताप रा. गणेशवाडी, वरवंड, पुणे ४) किशोर ऊर्फ शिवा छबु साळुंके रा. बोरीपार्धी, केडगाव, पुणे यांना अटक करणेत आली आहे. नमुद आरोपींची मा. न्यायालयाकडुन ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेणेत आली आहे. सदर गुन्हयाचे तपासामध्ये वरिल प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हयाचे तपासामध्ये यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे.
सन २०१५ मध्ये कुविख्यात गुंड व वाळुमाफिया आप्पा लोंढे याचा खुन आरोपी नामे १) संतोष भिमराव शिंदे रा. शिंदवणे ता. हवेली जि. पुणे २) निलेश खंडु सोलनकर रा. डाळींब दत्तवाडी, ता. हवेली जि. पुणे ३) राजेंद्र विजय गायकवाड रा. शिंदवणे ४) आकाश सुनिल महाडीक रा. उरुळीकांचन ५) विष्णु यशवंत जाधव रा. माळवाडी ६) नागेश लक्ष्मण झाडकर रा. उरुळीकांचन यांनी केला होता. त्यांना मोका केस मध्ये शिक्षा लागल्याने ते अद्याप जेलमध्ये आहेत. सदर केस मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार व वाळुतस्कर याने आरोपींना शिक्षा होऊ नये म्हणुन प्रयत्न केला या संशयावरुन, दि. २२/१०/२०२१ रोजी संतोष जगताप याचे मर्डर केस मधील आरोपी नामे विष्णु यशवंत जाधव याने कट रचुन संतोष जगताप याचा खुन केला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोर झालेल्या गोळीबारामध्ये संतोष जगताप व इतर दोघांचा खुन झाला होता. सदर घटनेमुळे त्यावेळी संपुर्ण पुणे शहर हादरले होते.
सध्या संतोष जगताप याचे खुन खटल्याची सुनावणी सुरु होत आहे. अशावेळी सदर केसमधील मुख्य साक्षीदारांच्या साक्षीवर यातील सर्व आरोपींना फाशी किंवा जन्मठेप अशी शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे ही गोष्ट आरोपींना ज्ञात असल्याने त्यांनी मुख्य साक्षीदारांना संपवुन टाकण्याचा कट रचला होता. त्याप्रमाणे त्यांनी कोर्ट पेशीचेवेळी मोठी रक्कम देण्याचे आश्वासन देवुन अटक आरोपींना त्यांचे बाहेर असलेल्या साथीदारांना अग्निशस्त्र पुरवले असल्याची बातमी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एल. चव्हाण व त्यांचे टीम ला मिळाली होती.कोणाची तरी सुपारी घेणे व त्याला ठार करणे व समाजामध्ये दहशत माजवणे असे तरुण पिढीला अगदी सोपे वाटू लागले आहे. कायदा म्हणजे काय तर सहा महिन्यात बाहेर पण पोलिसांचे ब्रिदवाक्य ('सद्रक्षणाय खलनिग्रहणाय') खलनिग्रणाय) याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत.पोलीस अगदी सत्यात उतरवत आहे..त्यांच्या सतर्कते मुळे , समाजामध्ये भय पसरवणाऱ्या टोळक्या आता गुन्हा होण्याच्या अगोदरच ताबडतोब ॲक्शन घेतल्याने अनेक गुन्हे अटक्यात येत आहेत. *कोयता विरुद्ध* *दांडके ही लढाई कशी होणार ..?धाडस.. म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे धाडस...* कौटुंबिक प्रश्न हा पोलिसांना देखील असतो हे सुद्धा विसरून समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी अशी खांद्यावर जबाबदारी घेणारे पोलीस अधिकारी यांना मानाचा सॅल्यूट...अशीच एक घटना लोणी काळभोर मधील पोलीस स्टेशनच्या हद्दी लोणी स्टेशनच्या परिसरात घडली आहे.त्यावर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णीक, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमित गोरे यांचे पथकातील पो. हवा. नितीन गायकवाड, सुदर्शन बोरावके, पो.ना. अमित साळुंके, पो. ना. देवीकर, पोना नागलोत, पोना जाधव, पोशि गणेश भापकर, पोशि विर, पोशि शिरगीरे, पोशि कुदळे, म.पो.शि. फणसे, यांनी बातमीप्रमाणे सापळा रचुन यशस्वी सापळा कारवाई केली व आरोपीतांना अटक करुन त्यांचा कट उधळुन लावला आहे. अटक आरोपींनी सदर गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण करीत आहेत.