सुनील भंडारे पाटील
उरवडे (तालुका मुळशी) येथील तलाठी व कोतवाल 2 हजार रुपये लाच मागणी करून तडजोडी आणती 942 /- रुपये लाचेची मागणी केल्याने, संबंधित तलाठी व कोतवाल यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी कारवाई केली आहे,
याबाबतीत पौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 47 / 2023 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७/१२ नुसार लोकसेवक तलाठी संजय बाबुराव दाते सेवा ठिकाण उरवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे, त्याचप्रमाणे कोतवाल अमित भंडलकर यांच्यावर 2 हजार रु लाचेची मागणी तडजोडी अंती रक्कम 942 लाचेची मागणी केल्याबद्दल भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग पुणे यांनी कारवाई केली, यामधील तक्रारदार याची माहिती अधिकारातील कागदपत्र विनाशुल्क देण्याबाबत राज्य माहिती आयोगाचा आदेश असताना, तलाठी संजय दाते याने 2000 रुपये लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती, सदर तक्रारीची पडताळणी केली असता दाते याने माहिती अधिकारातील पत्रकांच्या प्रती देण्यासाठी 2 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंति 942 रुपये लाचेची मागणी केली, या लाच मागणीस कोतवाल भंडलकर याने सहाय्य केले म्हणून दोघांवर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटच्या पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार करत आहेत, सदरची कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाने पथकाने केली,