सुनील भंडारे पाटील
निसर्गाची किमया अगाध आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे निसर्गाच्या सानिध्यात चक्क छत्रपती शिवराय अवतरले,
सजीव सृष्टीला तारणारा हा निसर्ग असून निसर्गाची किमया आपल्याला अनेक ठिकाणी पहावयास मिळते आकाशामध्ये कधी कधी देवांची रूपे अवतरतात हे अनेकदा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले आहे, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी आपल्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत स्वराज्याचे थोरले धनी चक्क धाकले धनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घ्यायला निसर्गाच्या माध्यमातून आलेले आहेत, निसर्गाच्या सानिध्यात हुबेहूब छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिकृती तयार झाल्याचे आपल्याला छायाचित्रांमध्ये पहावयास मिळत आहे,
हे छायाचित्र गावातील व्यक्तींनी टिपले असून, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अमोल पांडे यांच्या घरासमोरील झाडावर वेलींच्या व झाडाझुडपाच्या माध्यमातून जाणता राजा श्री छत्रपती शिवरायांची प्रतिमा हुबेहूब तयार झाल्याचे आपल्याला दिसत आहे, निसर्गाच्या माध्यमातून आजही शिवछत्रपती जिवंत असल्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आपल्या डोळ्याचे पारणे फेडित आहे, धर्मवीर शंभूराजांच्या भेटीला पिता छत्रपती श्री शिवराय आल्याचे येथे स्पष्ट होत आहे,