अवैध हातभट्टी दारू बनवणाऱ्या भट्टीवर लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई

Bharari News
1 minute read
0
सुनील भंडारे पाटील
               लोणीकंद (ता हवेली) पोलीस स्टेशन पुणे व राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमधील पेरणे, भावडी व अष्टापूर येथील अवैध गावठी दारू भट्ट्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने उध्वस्त करण्यात आल्या,       
    याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार भावडी गावातील बोरकर मळा येथील 500 लिटरच्या 3 टाक्या फोडून त्यामधील 1500 लिटर हातभट्टी दारूचे कच्चे रसायन नष्ट केले, तसेच डोंगरगाव ओढ्यालगत सिमेंट वीट बांधकाम केलेली टाकी फोडून त्यामधील 1500 लिटर हातभट्टी दारूचे कच्चे रसायन नष्ट करून, आरोपी गणेश धनाजी परदेशी व भारती संजय राजपूत यांचे विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या कारवाईमध्ये १ लाख 53 हजार किमतीचे 3 हजार लिटर हातभट्टी दारूचे कच्चे रसायन तसेच हातभट्टी बनवण्याचे इतर साहित्य नष्ट करण्यात आले, लोणीकंद पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे,
     सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय झुरुंगे, पोलीस हवलदार दीपक ठाणगे, बाळासाहेब सकाटे, पोलीस अंमलदार संदेश शिवले, अमोल भोसले, नितीन मोरे, बाळासाहेब तनपुरे, सागर पाटील, तुषार पवार, प्रशांत धुमाळ, पोलीस शिपाई बेलेकर यांनी केली,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 20, June 2025