सुनील भंडारे पाटील
पूर्व हवेली पट्ट्यामध्ये श्रीक्षेत्र वाडेबोल्हाई आणि केसनंद परिसरात प्लॉटिंग व्यवसायिकांनी कायद्याची सर्व बंधने झुगारून, राजरोसपणे दिवसा ढवळ्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उघड्या डोळ्यासमोर प्लॉटिंग व्यवसाय खोलून जमिनीची चाळण केलेली आहे,
श्रीक्षेत्र वाडेबोल्हाई तसेच केसनंद गावचा परिसर म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला, झाडे झुडपे, प्रशस्त हिरवळीचा गालिचा, दक्षिण बाजूला असलेली डोंगररांग, पुरातन काळापासून या परिसरातील सौंदर्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, परंतु प्लॉटिंग व्यवसायिकांनी परवानगी नसताना कायद्याची पळवाट शोधत झाडे झुडपे, टेकड्या नष्ट केलेल्या आहेत, प्लॉटिंग व्यवसायिक अगदी डोंगराच्या पायथ्याला भिडलेले आहेत डोंगराचा पायथा कोरण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे, एकंदरीत येथील निसर्ग सौंदर्याला प्लॉटिंग व्यवसायिकाकडून गालबोट लागले असून, या व्यवसायिकांना नेमकं कोणाचे पाठबळ आहे, याविषयीची चर्चा परिसरात रंगू लागली आहे, राजरोसपणे प्लॉटिंग व्यवसायिकांचा अंधाधुंद कारभार महसूल खात्याचे अधिकारी मात्र उघड्या डोळ्याने पाहत आहेत, अवैध चाललेले या व्यवसायावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत,
हवेली पूर्व पट्ट्यातील वाडेबोल्हाई आणि केसनंद या भागातील प्लॉटिंग व्यवसायाची चेक करून व पाहणी करून योग्य ती कारवाई करू,
" हवेली तहसीलदार किरण सुरवसे "
श्री क्षेत्र वाडे बोल्हाई तसेच केसनंद परसरातील प्लॉटिंग व्यवसायिकाची पाहणी करून संबंधित गावातील तलाठ्यांना पंचनामे करायला लावू तसेच संबंधित व्यवसायिकांवर कारवाई करू,
" मंडल अधिकारी अशोक शिंदे "