सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे पुणे नगर महामार्गावर बाजार मैदान दोन्ही चौकाच्या दरम्यान ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे,
पुणे नगर महामार्ग बनत चालला आहे मृत्यूचा सापळा याचा प्रत्यक्ष अनुभव दररोज नागरिकांना व प्रवाशांना येत आहे, महामार्गाच्या नूतनीकरणामुळे बेशिस्त वाहन चालक, वाहनांचा अतिवेग यामुळे गंभीर अपघात होत आहेत, अनेकांचे प्राण जात आहेत, आज दुपारी 2:30 वाजता महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात निखिल शिवराव रावत वय 25 राहणार खारघर नवी मुंबई, सध्या राहणार मगरपट्टा सिटी पुणे याचा जागीच मृत्यू झाला, याविषयी प्रशांत शिवाजी जाधव वय 29 रा, कॅप्सूल नगरी, पळशी रोड, शिरवळ,सातारा यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिली आहे,
आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास जाधव आणि रावत हे दोघेजण दुचाकी नंबर KA 51 HH 8226 या मोटरसायकल वरून रामराजे देशमुख यांचे लग्नाकरिता सुकळी अहमदनगर येथे जात असताना फिर्यादी जाधव हे मोटरसायकल चालवत होते, कोरेगाव भीमा येथे पुणे नगर महामार्गावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून ट्रक नंबर MH12 KP 4998 ने जोरदार धडक दिली, ते दोघेही रस्त्यावर पडले, ट्रक चालक याने ट्रक न थांबवता तसाच पुढे काही अंतर नेला त्यावेळी निखिल रावत हा ट्रकच्या खाली अडकला होता, व त्याच्या अंगावरून ट्रक गेला होता, त्याचा जागीच मृत्यू झाला , या भीषण अपघातात रावत याच्या शरीराचा चेंदा मेंदा झाला होता हे दृश्य पाहून पाहणाऱ्यांचे काळीज हलले, याबाबतीत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक प्रफुल्ल चंद्रकांत निकाळजे राहणार खेडकर मळा, उरुळी कांचन, तालुका हवेली जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस फौजदार अविनाश थोरात, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मळेकर करत आहेत,