ग्रामीण- शहरी भागासह संपूर्ण राज्यात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात

Bharari News
0
 सुनील भंडारे पाटील
             हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात याचे महत्त्वाचे प्रतीक असणारा गुढी उभारून गुढीपाडव्याचा सण राज्याच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला,     
   आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच देशामध्ये दिवसेंदिवस हिंदू संस्कृती, रूढी, परंपरा,विविध प्रकारचे सण, यावर लोकांचे श्रद्धा व निष्ठा वाढत चालली आहे, सुधारित तंत्रज्ञानाकडे सद्यस्थितीत समाजाची वाटचाल चालली असली तरी हिंदू धर्मा प्रमाणे येणाऱ्या सणासुदीला जास्त महत्व दिले जाते, सर्व सण हे हिंदू तिथी पंचांगाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केलेले आपल्याला दिसतात,          
   इंग्रजी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष हे फॅड स्वातंत्र्य काळानंतर आले, त्या अगोदर हिंदुस्तान मध्ये अगदी प्राचीन काळापासून हिंदू धर्माप्रमाणे आजही नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला केली जाते, त्यामुळे हा सण महत्त्वाचा असून वर्षभरातील महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे,  
     आपल्या राज्याचा शहरी तसेच ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यामध्ये पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली, महिला- पुरुष पारंपारिक पद्धतीचे वेश परिधान करून उत्साहाच्या वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत केले, कित्येक ठिकाणी तर भगवे वश्र, आणि भगवा ध्वज परिधान केलेल्या गुढी उभारण्यात आल्या हे महत्त्वाचे आकर्षण ठरले,
              गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर, कपडे, नवीन दुचाकी चार चाकी गाडी, नवीन व्यवसायाची सुरुवात, जागा खरेदी याकडे लोकांचा कल  दिसत होता, एकंदरीत इंग्रजी महिना प्रमाणे येणाऱ्या नवीन वर्षापेक्षा हिंदू धर्माप्रमाणे सुरू होणाऱ्या नवीन वर्षाचे प्रतीक असणाऱ्या गुढीपाडव्यालाच प्राचीन काळापासून आजही महत्त्व दिले जात आहे, 
          शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, व्यावसायिक  तसेच समाजातील सर्वच स्तरांमध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असलेला दिसला, लहान,थोर,आबालुद्ध, महिला यांची दिवसभर आनंदात साजरा होणाऱ्या या सणाच्या दिवशी धावपळ दिसत होती,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!