३०० झाडांचे वृक्षारोपण करुण वारघडे यांचा वाढदिवस साजरा.कलिंगड कापुन केकला फाटा देत केला वाढदिवस- भरारी न्युज च्या वतीने सन्मान

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
         माहिती सेवा समितीचे  अध्यक्ष ,वृक्षसेवक चंद्रकांत गोविंद वारघडे यांचा २२ मार्च रोजी वाढदिवस होता त्यानिमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले होते की केक न ऐवजी झाडे, टीकाव, फावडे, घमेले, ठीबक पाईप अशाप्रकारे निसर्ग ऊपयोगी वस्तू भेट म्हणून आणाव्यात ते आव्हान स्विकारुण एखादा दुसरा केक सोडला तर सर्वांनी वरील प्रमाणे वस्तू भेट दिल्या त्यामध्ये २८७ झाडे, २५ टीकाव, १५ फावडे १२ घमेली ७ ठीबक बंडल,पक्षांसाठी ३०० की धान्य  तसेच अनेकांनी केक ऐवजी कलिंगड आनले होते अशाप्रकारे बकोरी देवराई वनराई प्रकल्पामध्ये निसर्गाचे सानिध्यात वारघडे यांनी त्यांचे सहकार्यांचे माध्यमातून ऊभ्या केलेल्या वनराईत साजरा करण्यात आला. 
  चंद्रकांत वारघडे हे माहिती आधिकार या कायद्याचे प्रशिक्षक, अभ्यासक आहेत त्यामध्ये त्यांनी अनेक प्रशासकीय आधिकार्याना घरचा रस्ता दाखवला आहे व प्रशासनावर चांगला दबदबा असणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळक संपुर्ण पुणे जिल्यात आहे त्याचबरोबर ते हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समीतीचे सदस्य म्हणून काम पाहात आहेत.  
  वारघडे हे माहिती सेवा समिती या संस्थेचा माध्यमातून अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग घेत असतात त्यामध्ये दुष्काळी भागात जनारावासाठी चारा वाटप, गडकिल्ले कडेकोट मोहीम, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन यामध्ये खुप मोठ्याप्रमाणात काम करत आहेत २०१७ पासून वृक्षारोपणाचे काम चालू केले आजपर्यंत त्यांनी ५२००० झाडे लावली आहेत व त्याचे स़गोपण नियमित चालू आहे त्यामध्ये पिंपळे जगताप (शिरुर) धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प २२००० झाडे बकोरी (हवेली)  बकोरी देवराई वनराई प्रकल्पात ३०००० झाडे लावली आहेत व भविष्यात पुणे जिल्हा परीसरात १ कोटी झाडे लावण्याचा वारघडे यांचा माणस आहे त्यासाठी सर्वांनी मदत करण्याचे आव्हान वारघडे यांनी केले. 
   वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्यांचे सहकारी वृक्षमित्र धर्मराज बोत्रे(अध्यक्ष माहीती सेवा वृक्षसंवर्धंन समिती शिरुर ) शरदराव पाबळे (अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य) ,अनिल काशीद (शिवसेना नेते) , जेष्ट समाजसेवक ऊद्योजक  ॲड. लगड ,  संदीप ढफळ ,लक्ष्मण गव्हाने (अध्यक्ष पुणे जिल्हा माहीती सेवा समिती ) कमलेश बहीरट (अध्यक्ष  माहिती सेवा समिती हवेली) जयश्रीताई  राजेंद्र सातव पाटील ( मा सरपंच वाघोली) मोहीनी सातव (महीला अध्यक्ष माहिती सेवा समिती हवेली)  ,नानासाहेब जाधवराव, नानासाहेब गोते,पिंटू कटके ,प्रकाश हरपळे,नतीन कंद ,बाळासाहेब वारघडे, दिपक गाडुते ,दत्तात्रय वारघडे, सागर वारघडे, अमोल पोटवडे ,पत्रकार विजयराव लोखंडे ,ऊद्योजक विजय गायकवाड ,शरदराव टेमगीरे ( अध्यक्ष माहीती सेवा समिती शिरुर,  तालुका),सागर खांदवे ( सचीव पुणे जिल्हा माहिती सेवा समिती)पेरणे येथील प्रकाश वाघमारे, सचिन वाघमारे, अमोल वाळके, राहुल पोटवडे ,मयुर गोते ,गणेश गवारे (उपाध्यक्ष पुणे शहर माहिती सेवा समिती, गणेश जाधव,प्रकाश नागरवाड, अलका सोनवने,साहेबराव आव्हाळे, उद्योजक संदीप उंद्रे, संदीप कोलते, धनराज वारघडे यांचे सहीत शेकडो कार्यकर्ते पूर्ण दिवस शुभेच्छा देण्यासाठी व वृक्षारोपणासाठी उपस्थित होते. यावेळी भरारी न्युज च्या वतीने चंद्रकांत वारघडे यांचा सन्मानचिन्ह, शाल,नारळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!