सुनील भंडारे पाटील
शिरूर - हवेली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी विधानसभेमध्ये चाललेल्या अधिवेशनात मतदार संघाच्या वतीने दमदार भूमिका मांडत विरोधकांना गोड शब्दात समजवण्याचा प्रयत्न केला, मतदार संघाचे आमदार पवार यांचे विकास कामे बाबतीतील धडपड यावरून स्पष्ट होत आहे,
आमदार पवार यांनी विकास कामांच्या माध्यमातून शिरूर हवेली मतदारसंघात अनेक गावांच्या कानाकोपऱ्यात विकास कामांची रेलचेल केली आहे, विकास कामांमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारे आमदार पवार यांची ख्याती आहे, राज्यात अचानक राजकीय पटलावर बदल होऊन सरकार बदलल्याने आमदार पवार यांच्या नाड्या थंड पडल्या, विकास कामांना अचानक ब्रेक लागल्याने पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत विधानसभेत विरोधकांना चांगलाच गोड टोला लगावला,
" अध्यक्ष महोदय तुम्ही थोडं तरी यांना सांगावं की विकास कामांना जे स्टे दिलेत ते तरी उठवा, आम्ही काय वेगळ्या कोणाची लेकरे आहोत का, आम्ही पण या महाराष्ट्राची लेकरे आहोत, एकाला एक न्याय दुसऱ्याला वेगळा न्याय का? का ष्टे उठवत नाही, काय पाप केले आम्ही? कदाचित आज तुम्ही तिकडे असाल उद्या तुम्ही आमच्याकडे पण येताल " अशा गोड शब्दात शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी विरोधकांची चांगलीच कान उघडणी केली,