ऐकलं का....! शिक्रापूरचे अविनाश थोरात झाले पीएसआय

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
           शिक्रापूर (तालुका शिरूर) पोलीस स्टेशन येथे सेवेत असणारे अविनाश थोरात यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी (PSI) नियुक्ती करण्यात आली, थोरात यांच्या या नियुक्तीबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,         
  पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांची पोलीस खात्याच्या सेवेमधील हे चौथे प्रमोशन असून, ते मूळचे दौंड येथील रहिवासी आहे, आपल्या कष्टमय जीवनामधून त्यांनी लोकसेवा करण्याचा ध्यास लहानपणापासून घेतला आहे, त्यांचे मूळ शिक्षण १२ वी पर्यंत दौंड येथे झाले, वडील आणि आजोबा रेल्वे खात्यात सेवेत होते, शिक्षणानंतर त्यांनी 1989 साली ते पोलीस खात्यात भरती होऊन पोलीस कॉन्स्टेबल पदी रुजू झाले, त्यानंतर 2000 ला पोलीस नायक,2007 ला  पोलीस हवालदार,2017 ला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, त्याचप्रमाणे आत्ता 2023 ला पोलीस उपनिरीक्षक पदी प्रमोशन असे चार वेळा प्रमोशन त्यांनी आपल्या कार्याच्या व समाजसेवेच्या जोरावर घेतले, त्यांनी आपल्या सेवेच्या कार्य खंडात उत्कृष्ट सेवेबद्दल 100 पारितोषिके मिळवली आहेत,     
      त्यांनी आपल्या सेवेमध्ये वेळोवेळी लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, गंभीर गुन्ह्यांचा योग्य दिशेने तपास केला, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये त्यांचा हिरहिरीने सहभाग असल्याने, तसेच वादामध्ये समेट घडून आणणे, व गुन्हेगाराला  शिक्षा देणे, या कामाची ही पोचपावती असल्याचे थोरात यांनी सांगितले, यापुढे देखील अशा कामांना प्राधान्य दिले जाईल असे देखील त्यांनी बोलताना सांगितले,        
       शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या हस्ते थोरात यांनी पदभार स्वीकारला, यावेळी टू स्टार्ट देऊन थोरात यांना सन्मानित करण्यात आले, पोलीस खात्याच्या दप्तरी नोंद झाल्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत थोरात यांनी पदभार स्वीकारला, थोरात यांच्या या बढती बद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!