आळंदीत माझी वसुंधरा निमित्त जनजागृती,प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा यासाठी चिमुकल्यांची प्रभात फेरी

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
      आळंदी नगर परिषदेमार्फत माजी वसुंधरा अभियान चालू आहे आळंदी मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर रस्त्यावर कचरा टाकू नये आळंदी स्वच्छ ठेवावी यासाठी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक दोनच्या चिमुकल्यांनी आळंदीमध्ये प्रभात फेरीचे आयोजन केले होते तसेच प्रदूषण होऊ नये आणि पर्यावरण पूरक होळी केली जावी यासाठी आग्रह धरत या शालेय विद्यार्थ्यांनी आळंदी परिसरात घोषणा देत प्रभात फेरी काढली, 
   आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी तुमकुर घाण झाल्याची चित्रे मोठ्या प्रमाणात दिसतात गुटखा तंबाखू सार्वजनिक ठिकाणी खाऊन ठोकण्याचे प्रमाणही आळंदी जास्त आहे त्यामुळे पायी पदयात्रेने विना चपलेने, अनवाणी चालणाऱ्या वारकरी ,भाविकांना, प्रदक्षिणा घालण्यात किळसवाणी  पायवाट चालवी लागते, याबाबत हि नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे, 
आळंदी नगर परिषद तर्फे माझी वसुंधरा अभियान चालू आहे. या अभियान अंतर्गत आळंदी शाळा क्रमांक 2 च्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून वसुंधरा वाचवा, प्लास्टिक चा वापर टाळा,असे पर्यावरण पूरक घोषणा देत जनजागृती केली. तसेच पर्यावरण  पूरक होळी साजरी करूया. नैसर्गिक रंग वापरूया असाही संदेश दिला. या प्रभात फेरी साठी आळंदी शाळा क्रमांक 2 च्या मुख्याध्यापक सौ. घनवट मॅडम, तसेच  बडे सर, बहिरट मॅडम. सय्यद सर हे ही उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!