सुनील भंडारे पाटील
पेरणे (तालुका हवेली) येथील भीमा नदीच्या नवीन पुलाच्या पश्चिम टोकाला वायरच्या साह्याने फास लावून एकाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली, ही घटना पाहण्यासाठी बघयांनी गर्दी केली होती, दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,
भीमा नदीच्या तीरावर दोन पूल आहेत पुण्याकडे येण्यासाठी ब्रिटिशकालीन पूल तसेच नगर कडे जाण्यासाठी नवीन पूल, या नवीन पुलाच्या पश्चिम बाजूच्या टोकाला पेरणे गावच्या हद्दीत एका व्यक्तीने जाड काळया वायरच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली, ही घटना सकाळी नऊच्या दरम्यान घडल्याने, पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती, शंकर चेतुराम बारवसा वय 25 वर्ष, राहणार वाघमारे वस्ती पेरणे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे, तो या भागात बांधकाम मिस्तरी चे काम करत होता, त्याचे सर्व नातेवाईक वडगाव शेरी पुणे येथे राहण्यास असून, पेरणे पोलीस स्टेशनच्या वतीने समक्ष घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आला आहे, आज सकाळी या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, बघयांनी गर्दी केल्याने पुणे नगर महामार्गावर वाहतुकीची थोडी कोंडी झाली होती, पुढील तपास पेरणे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे करत आहेत,