रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
तुकोबांची गाथा ही पाचवा वेद आहे. गाथा वाचली की माथा सरळ होतो. अध्यात्मातील विज्ञान माहित नसल्यामुळे तरुण पिढी अध्यात्माला नाव ठेवत आहे. माञ परदेशातील या वर संशोधन करुन वेगवेगळे शोध लावत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. सृष्टीताई गायकवाड ( मलठण ) यांनी केले.वाघाळे (ता. शिरुर) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या ज्ञानेश्वरी व गाथा हे " द मँनेजमेंट आँफ गुरु " आहेत. त्याचा आपल्या जीवनात वापर केल्यास आपले जीवन आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो. तसेच मानवी जीवना रोज च्या व्यवहारात अध्यात्म व विज्ञानाची कशी सांगड आहे. याची ही त्यांनी उत्तम उदाहरणे दिली. यामध्ये कुंकवातील रासायनिक घटकांमुळे मनशांती निर्माण होते. म्हणुन महिला वर्ग सुरवातीपासुनच कुंकू लावत आल्या आहेत. तर पायातील जोडव्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत पणे पार पडते. त्यामुळे लग्न झाल्यावर पायात जोडवे घालण्याची प्रथा आहे. असे ही त्यांनी आपल्या किर्तनरुपी सेवेतुन नमुद केले.या प्रसंगी किर्तनासाठी वाघाळे व परिसरातील शेकडो भाविक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.