सुनील भंडारे पाटील
ऐन उन्हाची तीव्रता वाढत असताना आज दुपारी 4:00 वाजता सणसवाडी (तालुका शिरूर) येथील निसर्ग सौंदर्याने नटलेला महादेवाचा श्री नरेश्वर डोंगराला आज अचानक आग लागल्याने सुमारे साडेचार हजार झाडांची राख रांगोळी झाली,
सात वर्षांपासून म्हणजे 2017 सालापासून ग्रामस्थांनी श्री नरेश्वर डोंगरामध्ये वृक्ष लागवडीचे धोरण राबवले होते, तसेच ही झाडे जगवण्यासाठी ग्रामपंचायत च्या वतीने पाणीपुरवठा करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून झाडे जगवून मोठे केली होती, आज अज्ञात इसमाने या डोंगराला आग लावून सणसवाडी करांच्या कष्टाची राख रांगोळी केली, ग्रामस्थांनी आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला, सणसवाडी हद्दीतील श्री नरेश्वर डोंगरावरील झाडे आगीच्या धगीमुळे, तसेच धुरामुळे जळून गेली, तसेच ही आग कोरेगाव भिमाच्या वन क्षेत्राकडे आली होती, यामध्ये खूप मोठी निसर्गाची हानी झाली असून, सणसवाडी करांच्या कष्टाची राख झाल्याने, सणसवाडी ग्रामस्थांच्या डोळ्यांना अक्षरशा अश्रू आले,