सणसवाडीत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

Bharari News
0
सणसवाडी - ज्ञानेश्वर मिडगुले
     सणसवाडी (ता शिरूर) येथे आज सकाळी ६ते ९ श्रींची महापुजा व अभिषेक करून तिन दिवसाचे यात्रोत्सवास उत्साहात सुरुवात झाली, देवळाचे दरवाजे यात्रेनिमीत खुले करून गाभाऱ्यात जाऊन दर्शन असलेने भाविकांची पुजा व दर्शनाची गर्दी लोटली . सायं ४ ते आठ झांज पथकाच्या वाद्यांच्या गजरात पालखीची मिरवणुक काढून आरती झाली .
  दि. ७ ला बैल गाड्याच्या भव्य शर्यतीस साडेचार लाखापर्यंत एकूण ईनाम ,ट्राफीज व मानाची गदा अशी बक्षीसे असून रात्री पुजा कला केंद्राचा आर्केस्ट्रा होईल . शनीवार दि ८ रोजी कुस्त्यांचा आखाडा व रात्री अंबिका कला केंद्राचा कार्यक्रम आहे . सणसवाडी गावातर्फे पंढरपुर येथे मोठी धर्मशाळा झाली पण यंदा आळंदीतही चांगली धर्मशाळा घेतली असून प्रत्येक घरचे , कंपन्या , ग्रामस्थ व दात्यांचे सहकार्यातून ते काम पुरे होण्यासाठी यात्रेच्या कारणेची रक्कम धर्मशाळेस वापरणार असल्याने नागरीकांनी , परप्रांती य स्थायीक झालेल्या उद्योजक व कामगार आणि दानशूर व्यक्तींनी उदार भावनेने देणग्या द्याव्यात असे आवाहन सणसवाडी ग्रामस्थ व यात्रा कमीटीने केले आहे .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!