मांडवगण फराटा आरोग्य केंद्राला ध्वजारोहणाचा विसर

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
           आज पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात सकाळीच ध्वजारोहण करून झेंडावंदन करण्यात आले. तसेच शिरूर तालुक्यातील पूर्व भागात देखील शाळा,कॉलेज,ग्रामपंचायत कार्यालय,पाटबंधारे ऑफिस याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.   
  नुकताच प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा यांना जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाने तालुका स्थरिय उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार मिळाला आहे. आरोग्य केंद्रातील सर्वांचे पुरस्कार मिळाला म्हणून जोरदार सत्कार समारंभ संपन्न होत आहेत. आज देखील श्री वाघेश्वर विद्याधामचे मुख्याध्यापक यांनी सर्वांचा सत्कार केला.
हे सर्व जरी खरे असले तरी आज महाराष्ट्र दिन आहे व ध्वजारोहण करायला पाहिजे हे आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, कर्मचारी यांना विसर पडला. प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की ध्वजस्तंभ वाकला आहे.त्यामुळे ध्वजारोहण केले नाही.आमचे कर्मचारी ग्रामपंचायत मध्ये ध्वजरोहन करण्यासाठी गेले होते. परंतु शेजारी जुन्या इमारती पुढे ध्वजस्तंभ चांगल्या स्थितीत असताना देखील तेथे ध्वजारोहण केले नाही. ग्रामपंचायत येथे आरोग्य विभागाचे कोणीही उपस्थित नव्हते असे डॉ .सातपुते यांना सांगितले असता त्यांनी सांगितले की ते नेमुन दिलेल्या ठिकाणी ध्वजारोहन करण्यासाठी लगेच निघून गेले.परंतु सकाळी ११ वाजता  ज्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा येथे पुरस्कार मिळालेला सत्कार समारंभ सुरू होता तेव्हा बहुतेक कर्मचारी उपस्थित होते.
   या सर्व घटनेची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांना दिली.त्यांना विचारले की आरोग्य विभागात ध्वजारोहण करणे बंधनकारक नाही का?  त्यांनी सांगितले की ध्वजारोहण करणे बंधनकारक आहे मी चौकशी करतो.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांना झालेल्या घटनेची माहिती दिली असता त्यांनी सांगितले की चौकशी करतो.सामाजिक कार्यकर्ते बालाजी कांबळे यांनी सांगितले की रस्त्याने जाताना प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा या इमारतीत कडे पाहिले ध्वजारोहण केले नाही असे दिसले याची माहिती वरीष्ठ अधिकारी यांना दिली असता त्यांनी सांगितले की चौकशी करून कारवाई केली जाईल. जर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर मी उपोषण करण्याचे निवेदन देणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!