अटकेपार मराठ्यांच्या शौर्याची यशोगाथा सांगणारा ऐतिहासिक मराठी चिञपट " बलोच "

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
      येत्या ५ मे सर्वञ प्रदर्शित होणार   "बलोच " चिञपट हा प्रत्येकाने चिञपटगृहातच पाहावा . असे निर्माते  ज्ञानेश गायकवाड  व गणेश खरपुडे यांनी पञकार परिषदेमध्ये सांगितले  . पुर्ण देशात व राज्यात हा चिञपट ५ मे  ला प्रदर्शित होणार असुन या संदर्भातील माहिती देण्याकरता पञकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते,  
    पानिपतच्या इतिहास नंतरचा भाग हा बऱ्याच लोकांना माहित नसुन हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे  या चिञपटामध्ये प्रविण तरडे .अशोक समर्थ . स्मिता गोंदकर असे दिग्गज कलाकार काम करत आहे .प्रकाश जनार्दन पवार हे चिञपटाचे दिग्दर्शक आहे .पानिपतच्या युध्दानंतर बलुचिस्तातील मराठ्याची होरफळ यांचे भयाण वास्तव या चिञपटात दाखवले आहे .पानिपतचा पराभव हा मराठ्यासाठी महाप्रलयच होता .या पराभवानंतर मराठ्याना बलुचिस्तामध्ये गुलामगिरी पत्कारावी लागली .या चिञपटामध्ये दिग्गज कलाकार प्रविण तरडे यांच्या नजरेत मराठ्याना मिळणाऱ्या वागणुकीत धगधगती आग व सुड भावना दिसत आहे .तर मराठ्यावर अत्याचार करणारा अफगाणी दिसत आहे .पनिपतची लढाई जरी मराठ्यासाठी पराभव असला तरी यामध्ये धगधगता इतिहास या रुपाने मांडला आहे पानिपतचे युध्द हे पराभव नसुन नक्कीच शौर्यगाथा आहे याचा अनुभव चिञपट पाहिल्यानंतरच येईल असे गायकवाड व खरपुडे यांनी पञकार रिषदेत बोलताना सांगितले  .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!