रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
जिल्ह्यात शिक्षक पतसंस्थात सर्वाधिक म्हणजे सुमारे ४०८ कोटी वार्षिक आर्थिक उलाढाल आणि १६१२ सभासद असणाऱ्या शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी विजय चंदरराव गोडसे तर उपसभापती पदी शर्मिला अर्जुन निचित यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नंदकिशोर पडवळ आणि अंजली शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर या निवडी करण्यात आल्या.मागील जून महिन्यात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने तिसऱ्यांदा निर्विवाद बहुमत मिळविले असून संस्थेचे २७ कोटी स्वभागभांडवल,११५ कोटी ठेवी,६कोटी बँक शेअर, ४ कोटी राखीव निधी,६० कोटी बँक कर्ज असून ८.९ दराने सुमारे १७९ कोटी कर्जवाटप केले आहे. आज झालेल्या मासिक सभेत सभापती, उपसभापती पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी डी .वाय. वराळ यांनी सांगितले.
यानंतर झालेल्या सभेत पॅनल प्रमुख अनिल पलांडे ,शिवाजीराव वाळके आणि संघटना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पदवीधर चे तालुकाध्यक्ष प्रकाश नरवडे,सरचिटणीस आप्पासाहेब जगदाळे, अखिलचे तालुकाध्यक्ष अशोक पठारे,राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन,अर्जुन निचीत केंद्रप्रमुख रामदास विश्वास,राजेंद्र टिळेकर, संचालक म्हतारबा बारहाते, संतोष विधाटे,अनिल शेळके,रामचंद्र नवले,नंदकिशोर पडवळ,चंद्रकांत खैरे, संदीप थोरात,अंजली शिंदे,मानसी थोरात,सुभाष कोरडे,कार्यकारी संचालक दत्तात्रय वडघुले,गोपीनाथ जाधव,सतीश ढेकणे यांच्यासह मा.सभापती कल्याण कोकाटे,प्रदीप गव्हाणे,संजय तळोले, नाथू वीर ,विठ्ठल देशमुख, पोपट गांधले, डॉ.अनिल वाखारे आणि अनेक सभासद उपस्थित होते.
संस्थेत सुरू असलेला सभासद हिताचा पारदर्शक कारभार पुढे नेत संस्थेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे आणि उत्तम प्रशासन करत कर्जवसूल वाढविणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले