लोणी काळभोर प्रतिनिधी
पुणे (तालुका-हवेली) मधील घटना.सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर आयुर्वेदिक उपचार केंद्रवर छापा टाकुन ०२ पिडीत महिलांची सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार. दि.०३/०५/२०२३ रोजी ऑफिस नं. ९, तिसरा मजला, अभिमन्यु पुरम, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे येथे आयुर्वेदिक उपचार सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असलेबाबत गोपनीय माहिती मिळाली असता. त्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गि-हाईक पाठवुन खात्री केली असता, आयुर्वेदिक उपचार केंद्रा मध्ये आयुर्वेदिक उपचाराचे नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून, त्या ठिकाणावरून एकुण ०२ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.या छाप्या मध्ये त्या ठिकाणाहुन मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण १,५२,०००/- रू किचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावेळी मालक व चालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्याविरूध्द सिंहगड पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता सिंहगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.पीडितांची सुटका केले बद्दल..पुणे पोलिसांनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या बाबतची उल्लेखनीय कामगिरी:-पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, मअपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त,गुन्हे, अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सहा. पोलीस निरीक्षक, अश्विनी पाटील, अनिकेत पोटे पोलीस अंमलदार, अजय राणे, तुषार भिवरकर, रेश्मा कंक, अमित जमदाडे, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.