सुनील भंडारे पाटील
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशामध्ये चित्रपट ग्रहांमध्ये द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून या चित्रपटाची कमाई 50 कोटींच्या पुढे गेलेली आहे, चित्रपट पाहण्यासाठी महिला व मुलींची संख्या जास्त आहे, पुढील काही कालावधीत या चित्रपटाची कमाई 100 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे,
हा चित्रपट सर्व चित्रपट ग्रहांमध्ये दर्शकांच्या पसंतीचा ठरला असून, काही आतंकवादी संघटनांकडून हिंदू तसेच ख्रिश्चन धर्मातील महिला व मुलींना जाळ्यात ओढून कसे फसवण्यात येते याचे ज्वलंत उदाहरण दिग्दर्शकाने चित्रपटाच्या माध्यमातून उतरवले आहे, सत्य परिस्थिती दाखवल्यामुळे समाजातील काही भाग चित्रपट प्रदर्शित करण्यावर अडथळा आणत आहे, परंतु याचा काही फरक पडेल असे वाटत नाही, देशांतर्गत बऱ्याचशा राज्यांमध्ये शहरांमध्ये या चित्रपटाची इंट्री दमदार झालेली आहे, हा चित्रपट पाहण्यासाठी विशेषतः महिला व मुलींची गर्दी जास्त दिसते, चित्रपटाच्या सुरुवातीपासून कॉलेजच्या मुलींना नशीले पदार्थाच्या आहारी घालून कशा पद्धतीने प्रेमाचे व पैशाचे आमिष दाखवून, फिजिकल रिलेशनशिप च्या माध्यमातून गरोदर ठेवून, तसेच विरोध करणाऱ्या मुलींचे अश्लील फोटोच्या माध्यमातून इस्लाम धर्मामध्ये ब्लॅकमेलिंग करून परिवर्तन करण्यात येते, तसेच त्यांना खोट्या पद्धतीने इस्लाम श्रेष्ठ असल्याचे सांगून खोट्या कागदपत्रांच्या साह्याने इस्लामी देशात स्थलांतर केले जाते, त्यानंतर त्यांना अतिशय वाईट वागणूक दिली जाते, याविषयी चे चित्रीकरण करण्यात आले आहे,
इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तसेच जगभरात इस्लाम वाढवण्यासाठी हे लोक कोणत्या थराला जातील हे सांगू शकत नाही, केरळ मधून सुमारे 32000 मुलींचे अपहरण करून त्या मुलींचे काय झाले असेल हे या चित्रपटावरून समजते, विशेषता हिंदू मुलींनी तसेच महिलांनी या चित्रपटाचा बोध घेणे महत्त्वाचे आहे शिवाय वडीलधाऱ्यांनी शिक्षणाबरोबर या पुढील काळात आपल्या मुलींवर, महिलांवर काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच हिंदूधर्म, संस्कृती, देव,आपली वंशावळ याची देखील माहिती देणे महत्त्वाचे आहे, तसेच मुला मुलींना रोज सकाळी देवपूजा सक्तीची करणे गरजेचे आहे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे या ठिकाणी भेट देऊन त्याविषयीची संपूर्ण माहिती मुला मुलींना दिली तर अशा स्वरूपाचे वाईट प्रसंग येणार नाहीत,