सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
दुष्काळग्रस्त मिडगुलवाडीच्या राजेंद्र पिंगळेचे संघर्षाअंती यशपुणे जिल्ह्यातील उंचवट्यावर वसलेल्या वर्षातून ६महिणे टँकर ने पाणी शासनाकडून पुरविले जाणार्या दुष्काळी वाडीतील राजेंद्र पिंगळे या जिद्दी व प्रयत्नवादी तरुणाला फळ मिळाले .अपयश ही यशाची पायरी असते म्हणतात, पण अशा बऱ्याच पायऱ्या चढउतार करताना राजेंद्र थकला नाही की हार मानली नाही म्हणून शेवटी प्रयत्नांती परमेश्वर म्हणीची साक्ष मिळाली .
माणसाच्या जीवनात प्रयत्नांना नशिबाची जोड मिळाली की यशाचा राजमार्ग सापडतो हे खरे असून कधी कधी मिळालेली एखादी गोष्ट नशिबात नसेल तर तोंडचा घास हिरावला जातो. मिडगुलवाडी येथील राजेंद्र पिंगळे या युवका बाबत घडलेला हा प्रसंग असून जीवनातील कसोटी पाहणाऱ्या वेदनादायी प्रवासात अत्यंत संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने मात केली तसेच मित्रांनी सतत पाठबळ दिले आणि नुकताच राजेंद्र पिंगळेची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.
मिडगुलवाडी या दुर्गम भागातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रपंच चालवणारा राजेंद्र पिंगळे घरची शेती थोडीफार मात्र पाणी नाही, मग गृहरक्षक दलात काम केले तुटपुंज्या पगारात भागेना, घरी आई वडील,पत्नी व दोन मुले मागील काळात मिडगुलवाडीच्या कामगार पोलीस पाटील पदावर परीक्षा देऊन नियुक्ती झाली परंतु काही असंतुष्ट स्पर्धकांनी अडचणी आणल्या. त्याने मॅजिक बस फाऊंडेशनच्या शैक्षणिक कार्यात जेमतेम पगारावर नोकरी स्वीकारली, त्यांनतर मात्र अत्यंत संयमी स्वभाव असल्याने संघर्ष करत पोलीस दलात जाण्याचे स्वप्न उराशी कवटाळले. २०१९ च्या पोलीस भरतीत पुणे लोहमार्ग पोलीस दलात प्रतीक्षा यादीत नाव आले, त्यावेळी निवड झालेल्या एका उमेदवाराच्या कागदपत्रात त्रुटी असल्याने राजेंद्र पिंगळे यांना नियुक्तीचे पत्र आले, सर्वांना खूप आनंद झाला, शाळेने, गावाने अभिनंदनाचे फ्लेक्स लावले. वैद्यकीय तपासणी होत कागदपत्रांची छाननी झाली. मात्र यावेळी ज्याच्या जागी नेमणूक झाली तो उमेदवार मॅटमध्ये गेला अन निकाल त्याच्या बाजूने लागला. सर्वांना तोंडघशी पडल्यासारखे झाले परंतु दुःख सांगणार तरी कोणाला, हातातोंडाशी आलेला घास नशिबाने हिरावून घेतला मात्र पण गडी हरला नाही. पुन्हा जिद्द बाळगली अभ्यास सुरूच ठेवला. पुण्यात अपयश आल्याने मुंबईचा आधार होता. वयाने बत्तीशी गाठलेली मागे मुलेबाळे. मुंबईचा पेपर दिला गृहरक्षक दलाचा कट ऑफ ११४ आला राजेंद्रला ११४ मार्क परंतु ११४ गुण मिळविलेले १६ विद्यार्थी त्यातून फक्त दोन निवडायचे यावेळी मात्र नेहमी हुलकावणी देणाऱ्या नशिबाने साथ दिली व जन्मतारखे नुसार दोन जागांपैकी पहिली जागा राजेंद्रला मिळाली, अखेर संघर्षाला यश आले व मुंबई पोलीस दलात पिंगळे यांची शेवटच्या क्षणी निवड झाली. यश अपयशाचा हिंदोळ्यावर कान्हूरच्या अभ्यासिकेत मित्र अशोक मिडगुले, अमोल मिडगुले, आकाश गाजरे आणि प्राचार्य अनिल शिंदे यांनी मोलाची साथ दिली असून पत्नीने पाठबळ दिले त्यातून यशाचा मार्ग सुकर झाला असे मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या राजेंद्र पिंगळे यांनी सांगितले.