सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील भीमा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून एका महिलेने आज दुपारी 3:00 वाजता च्या सुमारास पुलावरून नदीच्या पाण्यात उडी मारली, या उडी मारण्यामागील कोढे मात्र पाहणाऱ्यांना उलगडले नाही,
पुणे नगर महामार्गावर भीमा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या कठड्यावर चढून एका मध्यमवयीन, साडी पेहराव असलेल्या महिलेने स्वतःला खूप मोठ्या उंचीवरून नदीच्या पाण्यामध्ये झोकून दिले, ही घटना आज दुपारी साधारणता 3:00 वाजता घडली शेकडो जणांनी हे दृश्य पाहिले, काही काळ महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची दाट गर्दी झाली होती, परंतु या घटनेतील वैशिष्ट्य म्हणजे संबंधित महिला पाण्यामध्ये पडल्यानंतर पोहत नदीच्या पात्रातून बाहेर निघाली, ही घटना पाहण्यासाठी बघ्यांनी पुलावर मोठी गर्दी केली होती, या महिलेचे एवढ्या उंचावरून जीवघेणी उडी मारण्याचे कारण काय? अशी चर्चा पाहणाऱ्यांमध्ये चालू होती, उन्हाची तीव्रता सहन न झाल्यामुळे की आत्महत्येच्या उद्देशाने संबंधित महिलेने उडी मारली असावी हे कोडे मात्र उलगडले नाही, प्रवासी व नागरिकांमध्ये मात्र चर्चेला उधान आले आहे,