रांजणगाव येथे इर्टीका कारने अचानक पेट घेतल्याने गाडी सह दोन लाख रुपये जळून खाक

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
         पुणे- नगर महामार्गावर रांजणगाव येथील जुन्या टोलनाक्याजवळ मंगळवार (दि २३) रोजी दुपारी ३ वा. च्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी सीएनजी इर्टिका कारने अचानक पेट घेतल्याने गाडीत असलेल्या दोन लाख रुपये रोख रकमेसह संपुर्ण गाडी जळून खाक झाली. दुपारी भर उन्हात गाडीने अचानक पेट घेतल्याने मोठया प्रमाणात आग लागल्याने पुणे-नगर महामार्गावर दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत हेमेंद्र चंद्रकांत शहा यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.    
  रांजणगाव एमआयडीसी  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमेंद्र चंद्रकांत शहा (वय ४४ वर्षे)  रा. ४०५ जिवन काँ. हौसिंग सोसा. लि. /जिवन सप्ना, एम.जी. क्रॉसरोड नं.०४, पटेलनगरच्या पाठीमागे, कांदीवली वेस्ट, मुंबई यांचा इंडस्ट्रीयल हार्डवेअर मटेरीयल सप्लायचा व्यवसाय असुन त्यांच्याकडे कंपनी फिटेड सीएनजी इर्टीका क्र. एम एच ४७ बी बी ०७२० ही चारचाकी गाडी असुन (दि.२२) रोजी पहाटे ५ वा. च्या सुमारास हि गाडी घेवुन पुणे जिल्ह्यातील हार्डवेअर मटेरीयल सप्लाय केलेल्या दुकानदारांकडुन उधारीचे पेमेंट जमा करण्यासाठी आले होते. त्यांनी दिवसभर हडपसर, ऊरळीकांचन, कुरुकुंभ व बारामती परिसरातील हार्डवेअर दुकानदारांकडुन उधारीचे पेमेंट जमा करुन बारामती येथे मुक्काम केला.
मंगळवार (दि २३) रोजी दुपारी ११ वा. च्या सुमारास हेमेंद्र शहा बारामती येथुन शिरुर येथील हार्डवेअर दुकानदारांकडुन हार्डवेअर मटेरीयलचे उधारीचे पेमेंट जमा करण्यासाठी निघाले. शिरुर येथील हार्डवेअर दुकानदारांकडुन उधारीचे पेमेंट जमा करुन दुपारी ३ च्या सुमारास ते शिरुर येथुन पुण्याकडे हार्डवेअरच्या दुकानदारांकडुन उधारीचे एकुण २ लाख रुपये जमा करुन शहा यांनी गाडीमध्ये बाजुच्या शिटवरती बॅगमध्ये ठेवले होते. दुपारी ३ वा. च्या रांजणगावच्या हद्दीतील जुना टोलनाका येथील नगर-पुणे रोडलगतच्या संगम हार्डवेअर दुकानासमोर ते थांबलेले असताना होतो. त्यांनी रोडलगत गाडी उभी करुन येथील हार्डवेअरच्या दुकानात त्यांच्या हार्डवेअरच्या मटेरीयलची ऑर्डर घेत असताना त्यांच्या इर्टीका गाडीला आग लागल्याने आसपासच्या लोकांनी आरडाओरडा केला.
     त्यावेळी शहा यांनी गाडीकडे धाव घेतली असता गाडीने आतील बाजुने पुर्णपणे पेट घेतला होता. त्यावेळी शहा यांनी दरवाजा उघडुन पैसे ठेवलेली बॅग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता पैशाच्या बँगने पुर्णपणे पेट घेतला होता. शहा यांनी जमलेल्या लोकांच्या मदतीने बँग बाहेर काढुन पाहिले असता बॅगमध्ये ठेवलेले दोन लाख रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या होत्या. तसेच इर्टीका गाडी क्र. एम एच ४७ बी बी ०७२० हि पुर्णपणे जळुन गाडीचे नुकसान झाले.त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी हि आग आटोक्यात आणली. यावेळेस रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्याने ट्राफिक जाम झाले होते.  या घटनेत इर्टिका गाडी आणि २ लाख रुपये रोख रकमेसह सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असुन या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे हे करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!