खेड प्रतिनिधी लतिफ शेख
मंगळवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात नव्हे देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का पोहोचला.
शरद पवार यांचे नंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण या चर्चेला सध्या उधान आलेला आहे परंतु तीन नेत्यांची नावे आघाडीवर दिसतात यामध्ये अजितदादा पवार,प्रफुल्ल पटेल व सुप्रिया ताई सुळे.पवार साहेबांनी आपला राजीनामा मागे घ्यावा म्हणून राज्यात ठीक ठिकाणी विचार प्रवाह व्यक्त करण्यात आला परंतु आपण राजीनाम्यावर ठाम आहोत अशा पद्धतीच्या निर्णयानंतर आता राष्ट्रवादीला एक नवीन अध्यक्ष मिळणार आहे.नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे देशपातळीवर काम करणार का असा एक नवीन प्रश्न मनात येतो शरद पवारांनी राजकीय कारकीर्दीमध्ये अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे यामध्ये शिक्षण शेती सामाजिक व आर्थिक क्षेत्रात देश पातळीवरचे व महाराष्ट्राचे एक नंबरचा नेता म्हणून शरद पवारांना ओळखले जाते.