सणसवाडी (ता.शिरूर) येथील भैरवनाथ प्रासादिक दिंडीचे संत तुकोबारायांचे दिंडी सोहळ्यात सामील होण्यासाठी मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. विठ्ठलरखुमाई मंदिरापासून पालखीची टाळमृदुगांचे गजरात मिरवणुक काढून भैरवनाथ मंदिरात आरती करून देहूकडे प्रस्थान झाले,
वारकऱ्यांना दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदीनाथ हरगुडे , उपाध्यक्ष रामदास अप्पा व उपसभापती आनंदराव हरगुडे यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या . सरपंच सुवर्णा दरेकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव ,माजी सरपंच सुरेश हरगुडे , माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे, विजयराज दरेकर, शिवाजीराजे दरेकर, पोलिस पाटील हिरामण दरेकर, सप्ताह मंडळाचे अध्यक्ष काळुराम हरगुडे, सिताराम कांचन , उपाध्यक्ष निवृती सोनबा हरगुडे, काका गोसावी, दिंडी मंडळ सचिव मोहन हरगुडे, खजीनदार मोहन दरेकर, दरेकर बचत गट अलकाताई दरेकर , हभप विकास जाधव, . यावेळी चेअरमन सुरेश दरेकर , हभप बाळासो चव्हाण, विष्णु गोसावी, तुकाराम हरगुडे, यशवंत दरेकर, गुलाबनाना हरगुडे, भक्ती राम भोसले, विणेकरी सुदामतात्या दरेकर व ग्रामस्थ तसेच पांडुरंग भजनी मंडळाच्या पद्माताई दरेकर व शेकडो महिला व वारकरी उपस्थीत होते,