सुनील भंडारे पाटील
अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा असताना पावसाने दडी मारल्यामुळे राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांना चिंता लागली आहे, आखाड महिना चालू होऊनही अजूनही पाऊस पडला नाही, याची सर्वात जास्त धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे,
गेल्या आठवड्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, तुकोबारायांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली, आतापर्यंतच्या कालावधीमध्ये पालखी कधीही कोरडी गेली नव्हती, या पालख्यांनी आज 50 किलोमीटरचा पल्ला गाठूनही अजूनही वरून राजा बरसला नाही, अद्याप खरिपाच्या पेरण्या होऊन जात असतात, परंतु बरेच दिवस उलटूनही पाऊस अजूनही पडेना त्यामुळे याचा शेती पिकांवर तसेच पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ लागला आहे, विशेषता पावसावर अवलंबून असणारे शेती क्षेत्रामधील खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी तसेच लागवडी अजूनही प्रतीक्षेत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, ग्रामीण भागामध्ये अजूनही उन्हाची तीव्रता जोरदार असून केंदूर पाबळ, धामारी,परिसर त्याचप्रमाणे सासवड व इतर अनेक ठिकाणच्या डोंगर माळरानावरील शेती मधील शेती पिके जळण्याच्या मार्गावर आहेत, महागाईने त्रासलेल्या शेतकर्याची अवस्था आता पावसाने दडी मारल्याने कंबरडे मोडल्यासारखी झाली आहे, पावसाने मारलेली दडी तसेच उन्हाची तीव्रता यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे,