कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या पालखी सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला,
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात, सध्या देहू आळंदी ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालख्या पंढरपूरला पाई वारीच्या माध्यमातून पोहोचले आहेत, आषाढी एकादशी निमित्ताने सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने गावामध्ये दिंडी व पालखीचे आयोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती, हातामध्ये भगवे झेंडे तसेच पारंपारिक पद्धतीने वारकऱ्यांची वेशभूषा असलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात कोरेगाव भीमा गावामधून पायी वारी करत पालखीची मिरवणूक काढली, यामध्ये सुमारे 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, चेअरमन भगवान भंडारे, संचालक सचिन भंडारे यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली,या कार्यक्रमाचे नियोजन, मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे, शिक्षिका भारती शिंदे, बेबी झावरे, शिल्पा मिस्त्री, निर्मला मुरकुटे, गीता ढगे, स्वप्नाली घावटे, शितल ताठे, रोहिणी शिंदे, वंदना कुमारी, सुजाता गवळी, अश्विनी उन्हाळे, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, सुप्रिया गव्हाणे, सुवर्णा देशपांडे, तनुश्री नायक, शिक्षक माधव बडे, मिलिंद गायकवाड, सागर वाणी यांनी केले होते,