सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) ते केसनंद ला जाणाऱ्या रोडवर दुचाकी आणि बोरवेल्स गाडी मधील झालेल्या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला गौरवी रवींद्र जाधव ( राहणार, गुलमोहर सोसायटी,वाघोली, मुळगाव कोल्हापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे,
याबाबत वाघोली पोलीस चौकी ने दिलेल्या माहितीनुसार दुचाकी घसरल्यानंतर दू चाकीवर पाठीमागे बसलेली तरुणी रस्त्यावर जाणाऱ्या ट्रक खाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघोली केसनंद रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपा समोर आज दुपारच्या सुमारास घडली, दुचाकी चालवणारा तरुणही जखमी झाला आहे, वाघोली मध्ये आतापर्यंत अनेक आशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत, प्रशासनाची दुर्लक्ष असल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, वाघोली ते केसनंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होत असते, या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी केसनंद ग्रामपंचायती ने केली आहे,
संबंधित रस्त्यावर अनेक त्रुटी आहेत, आज दुपारी खराब रस्त्यामुळे दुचाकी घसरल्याने पाठीमागे बसलेली तरुणी रस्त्यावरून चाललेल्या बोरवेल ट्रक खाली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाघोली व केसनंद ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे, संबंधित रस्त्याचे काम तातडीने व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, अपघाताच्या ठिकाणी वाघोली पोलीस स्टेशनच्या वतीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आला, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कर्णावर करत आहेत,