लोणीकाळभोर पोलीसांचे सतर्कते मुळे सराईतांनी केलेला खुनाचा कट फसला, वाचला एक जिव

Bharari News
0
लोणी काळभोर अनिकेत मुळीक
       लोणी काळभोर (तालुका हवेली)पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपुर्वी गुन्हेगार अभिषेक दत्तात्रय रामपुरे यास आरोपी अक्षय कांबळे याने मारहाण केली होती. हे दोघे पण रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून अरोपी अभिषेक हा लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडीलत तडीपार असलेल्या प्रणव शिरसाट याचे टोळीचा सदस्य असल्याने त्यांची पुन्हा मोठी भांडणे होऊन गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची शक्यता असले बाबतची गोपनिय माहिती लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तात्रय चव्हाण यांना मिळाली होती.   
   त्याअनुषंगाने सदरचे गुन्हेगारांवर पाळत ठेवण्या बाबतचे आदेश त्यांनी तपास पथक प्रभारी पोउपनिरी अमित गोरे व तपास पथकाला दिले होते.वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडुन मिळालेल्या आदेशाप्रमाणे तपास पथकातील अंमलदार हे तडीपार प्रणव शिरसाट व त्याचे टोळीचे इतर सदस्यांचे पाळतीवर होते. त्यातच तपास पथकातील अंमलदार पोशि वीर व कुदळे यांना काल दि. ३०/०६/२०२३ रोजी सायं. १८/३० वा. चे सुमारास माहिती मिळाली की, प्रणव शिरसाट टोळीचा प्रमुख सध्या तडीपार असलेला प्रणव शिरसाट व त्याचे टोळीचा तडीपार सदस्य अभिजीत आहेरकर पिस्टल व कोयत्या सारखी घातक हत्यार जवळ बाळगुन कोणतातरी गुन्हा करण्याचे उद्देशाने कदमवाकवस्ती परिसरात आले आहेत. त्यांनी सदरची बातमी लागलीच तपास पथक प्रभारी पोउपनिरी अमित गोरे यांना सांगीतली त्यांनी क्षणाचा विलंब न लावता सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना कळवुन त्यांचे आदेश व मार्गदर्शना प्रमाणे सोबतचे पोलीस स्टाफसह कारवाई करणे करीता रवाना झाले. पोलीस स्टाफ कदमवाकवस्ती, पालखी स्थळ येथे गेलो असता. तेथे पालखी स्थळ मैदानाचे कडेला पालखी विसावा शेडचे जवळ टोळी प्रमुख प्रणव शिरसाट व अभिजीत आहेरकर हे मोटारसायकलवर थांबलेले पोलीस स्टाफला दिसले. पोलीस स्टाफला पाहुन ते दोघे तेथुन पळुन जात असताना पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेऊन त्यांचेकडुन एक गावठी पिस्टल व लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. मोठा गुन्हा रोखण्यात आला.पत्रकारांशी बोलताना लोणी काळभोर चे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण बोलत होते..अमित गोरे यांनी व यांचा पथकाने आपली चोख जबाबदारी बजावून एकाचा जीव वाचवला..तरी काही वेळेस पोलिसांवरच खापर फोडलं जाते,आम्ही गुन्हेगार याचं वर लक्ष्य ठेवत नसून.होणार गुन्हा देखील टाळतो..सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असं म्हणत पोलिस बांधव नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायम कर्तव्यदक्ष असतात. 
       तपास पथक प्रभारी पोउपनिरी गोरे यांनी तडीपार आरोपी १. प्रणव भारत शिरसाठ, वय २२ वर्षे, रा. आंग्रे वस्ती, लोणी स्टेशन, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे २. अभिजीत अभिमन्यु आहेरकर, वय २२ वर्षे, कन्या शाळेजवळ, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे तपास केला तेव्हा प्रणव शिरसाट याने अभिजीत आहेरकर, अभिषेक रामपुर व त्याचे इतर टोळी सदस्यांचे साथीने अक्षय कांबळे याचा खुन करण्याचा कट रचला असल्याची माहिती मिळुन आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिषेक दत्तात्रय रामपुरे, वय २१ वर्षे, धंदा शिक्षण, रा. अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे अभिषेक रामपुरे यालाही ताबडतोब अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्तुल, एक जिवंत काडतुस, तीन लोखंडी कोयते असा एकुण १०,८००/- रु किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांना मा. न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावली असुन पुढील तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, पोउनिरी अमित गोरे करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ - ५, मा. अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त सो. हडपसर विभाग,  दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक,सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पोहवा सातपुते, पोहवा / गायकवाड, पो. हवा २ बोरावके, पो. हवा सायकर पोना/  नागलोत, पो. ना. जाधव, पोशि पवार, पोशि कुदळे, पोशि/ शिरगीरे, पो.शि विर, मपोशि फणसे, सर्व नेमणुक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, यांच्या पथकाने केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!