केसनंद (तालुका हवेली) येथील जोगेश्वरी विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या राधाकृष्ण पार्क मध्ये अनेक रहिवासी तीन वर्षापासून राहत असून प्लॉटिंग मध्ये संघवी डेव्हलपर्स ने प्लॉटमधील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी शोष खड्डा खोदला असून सेफ्टी टॅंक ची व्यवस्थित व्यवस्था न केल्यामुळे शोष खड्ड्यामधून नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाणी ओसंडून वाहत आहे,
संपूर्ण पार्कमध्ये शोष खड्ड्यातून आलेल्या पावसाच्या व ड्रेनेज लाईनच्या खराब पाण्यामुळे पार्क मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, सेफ्टी टॅंक साठी पुरेसा खड्डा न खोदल्यामुळे संपूर्ण पावसाचे व ड्रेनेजचे पाणी एकत्रितपणे परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये शिरले आहे या पाण्यामधून साप बेडूक यांच्याबरोबर झुरळ व तत्सम प्राणी घरामध्ये शिरत असून मच्छर व इतर किटकांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,
परिसरामध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये ड्रेनेज लाईन आणि पावसाचे पाणी जाऊन विहिरी प्रदूषित झाले आहेत, पार्क मधील रहिवाशांनी या संदर्भात अनेक वेळा प्लॉट डेव्हलपर संघवी यांच्याशी संपर्क साधला असता डेव्हलपर्स कडून प्लॉट धारकांची मागणी धुडकवण्यात आली आहे , संघवी डेव्हलपर्स यांनी प्लॉट विक्री करताना ग्राहकांना स्ट्रीट लाईट, पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन, बाग बगीच्या अशी अनेक आश्वासने दिली असून,
ती अजून पूर्ण न झाल्यामुळे तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी सेफ्टी टॅंक ची व्यवस्था न केल्यास राधाकृष्ण पार्क मधील रहिवाशांकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे यासंदर्भात संजय संघवी प्लॉट डेव्हलपर्स यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात ही जबाबदारी प्लॉटमधील बांधकाम करणाऱ्या रहिवाशांची असून या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
पुर्व हवेली तालुक्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक ओढे नाले बुजवले त्यावर अनाधिकृत बांधकामे, प्लाटींग केले आहे अनेक बांधकाम व्यावसायिकांना परवानगी देताना महसुल आधिकार्यांनी स्थळ पाहणी न केल्याने सर्व सोसायट्या, गावांमध्ये पाणी घुसून अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे लोणिकाळभोर अप्पर तहसीलदार सौ तृप्ती कोलते पाटील यांनी समक्ष पाहणी करुन ओढे नाले बुजवले असतील त्याठिकाणी कारवाई केली पाहिजे.
चंद्रकांत गोविंद वारघडे
अध्यक्ष - माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य