खेड प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे दावडी विद्यालयांमध्ये करियर गायडन्स मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी किवळे विद्यालयाचे उपशिक्षक लतीफ शेख यांनी या वर्षातील पहिल्या सत्राचे करियर गायडन्स व्याख्यानाचे पुष्प गुंफले,
याप्रसंगी बोलताना दहावीनंतर पुढे काय अनेक जण असे सांगतात सायन्स, कॉमर्सला जा तुला चांगले मार्क्स पडले आहेत तू सायन्स ला जा यूपीएससी एमपीएससी कर परंतु पैसे कमवणे बंगला गाडी फक्त हाच उद्देश नसून यशस्वी जीवन कसं जगलं पाहिजे यावर अनेक उदाहरणे दिली बरेच जण सायन्सला जातात किती यशस्वी होतात हा चिंतेचा विषय आहे कोणते क्षेत्र निवडावे वैद्यक शास्त्र करियर्स विज्ञान कम्प्युटर्स आयटी क्षेत्र परंतु या सर्व क्षेत्रांमध्ये कॉम्पुटर चालणारी बोटे 12,14 हजार रुपये कमवतात परंतु तीच तबल्यावरची जाकीर हुसेन सारखी बोटे एका गाण्याचे एक एक कोटी रुपये कमवतात म्हणजेच आपल्याकडे असणारी कला कुठे वापरली पाहिजे तिला कसे वळण दिले पाहिजे हे सविस्तर सांगितले,
यानंतर विद्यालयाचे माजी प्राचार्य केंगारे यांनी ताण-तणावाचे जीवनातून कशी सुटका करावी याविषयी मार्गदर्शन केले अनेक गोष्टी चुटकुले उदाहरणे देऊन मुलांना हसवून आपल्या भाषणाकडे खेळवून ठेवले हास्याचे फवारे आनंदाच्या लहरी या वेळेला मुलांमध्ये उमटत होत्या
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बरबटे यांनी केले गुरुकुल प्रमुख अविनाश गुरव व सहायक पर्यवेक्षक विजय कानवडे यांनी आलेल्या व्याख्यात्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी विद्यालयाचे विद्यमान प्रभारी प्राचार्य राऊत यांनी आलेल्या व्याख्यात्यांचे विद्यार्थ्यांचे आभार मानले