व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन दिमाखात,उत्साहात साजरा

Bharari News
0
शिरूर प्रतिनिधी :  एकनाथ थोरात
        स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपुर्ण देश भर मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शिरूर तालुक्यातील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर सुवालालजी पोखरणा, व प्रमुख पाहुणे परेश सुराणा,  रामराज चव्हाण,  बाळू पडवळ,  हिरामण आदक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.         
परेश सुराणा यांच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना बाजरीच्या कट्टयामध्ये दीड तोळ्याचे मंगळसूत्र सापडले होते. त्यांनी ते त्यांचे मालक परेश सुराणा यांना परत केले आणि दाखवून दिले की जगामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे त्यांनी जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शाळेमध्ये  परेड साठी  महेश चासकर सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या नंतर विद्यार्थीनी देशभक्तीपर गीत , देशभक्तीपर गीतावर नृत्य , प्रार्थना आणि  नाटक  या व्यतिरिक्त काही विद्यार्थ्यांनी नाट्यछटा आणि समूह गीत अशा विविध कला सादर करून  उपस्थितांची मने जिंकून घेतली .
तसेच मंथन सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी व नाट्यछटे मधील विजेत्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
  प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिले आणि या प्रामाणिकपणाचा भविष्यात आपल्याला कुठेही उपयोग होऊ शकतो हे सांगितले आणि शाळेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या सर्व कार्यक्रमाचे पूर्ण व्यवस्थापन एकता मिस यांनी केले होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशी माहिती शाळेच्या प्राचार्य पसक्वीन कासी यांनी दिली .अशाप्रकारे शाळेचे चेअरमन  विकास पोखरणा  सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!