कान्हूर मेसाईमध्ये नेत्ररोग शिबीर संपन्न २५० रुग्नांनी घेतला लाभ

Bharari News
0
सणसवाडी प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिडगुले
       मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन च्या  सहकार्यातून मौजे कान्हूर मेसाई येथे ग्रां.प.च्या सहयोगाने नेत्र रोग तपासणी शिबिर पार पडले.या  मोफत नेत्र रोग तपासणी शिबिराचा लाभ सुमारे 250 नेत्र रुग्णांनी घेतला असून 40 पेक्षा अधिक रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले असल्याचे प्रतिपादन नेत्ररुग्ण तज्ञांनी केल्याची माहिती आयोजक मा.सरपंच दीपक बाळासाहेब तळोले यांनी दिली.  
 पैकी गेल्या वर्षीचे पूरग्रस्त बाधित बाबू जयवंत थोरात यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया माफक दरात विद्यमान  ग्रा. पं.सदस्या शर्मिला दत्तात्रय तळोले यांच्या वैयक्तिक मदतीतून केल्याची माहिती प्रकल्प अधिकारी सतिश धोंगडे यांनी दिली. सध्याच्या काळात  दृष्टी दोष असण्याच्या पार्श्वभूमीवर अर्थात डोळे येण्याच्या प्राप्त परिस्थितीत उच्चांकी नेत्र रुग्णांनी तपासणी केल्यानंतर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बबनराव दादा शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.या मोफत नेत्र तपासणीतून अल्प दरात चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शत्रक्रिया करण्यात आलेल्या  या शिबिराचे परिसरातून कौतुक होत आहे.  मा .सरपंच .बापू ननवरे, ग्रां. प.सदस्य .मोहन पुंडे यांनी  या उपक्रमाचे कौतुक केले असून ग्रामीण भागात पुरेशा गांभीर्य नसल्याने अधिकच्या नेत्र तपासणीची गरज असल्याचे मत व्यक्त केले.या अभिनव  उपक्रमाचे परिसरातील सर्वसामान्य जनतेकडून वाढत्या दृष्टी दोषाच्या भीती प्रसंगी स्वागत होत आहे आणि अशा लोकोपयोगी मोफत आरोग्य  शिबिराचा लाभ घेण्याचे  आवाहन मा.सरपंच.दीपक बाळासाहेब तळोले यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!