विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या ज्ञानोबारायांकडे आदिशक्ती मुक्ताईची रक्षाबंधन निमित्त राखी

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी आरिफभाई शेख
         श्रीक्षेत्र मुक्ताई संस्थान कोथळी मुक्ताई नगर येथील देवस्थान कडून प्रथा परंपरेप्रमाणे आज रक्षाबंधनानिमित्त आदिशक्ती मुक्ताईची राखी माऊलींच्या मंदिरात प्रदान करण्यात आली संत मुक्ताई संस्थांन च्या वतीने पुरुषोत्तम वंजारी यांनी सह पत्नी माऊलींची पूजा अभिषेक करत मुक्तांची राखी संत संजीवन समाधीस भक्ती भावा ने अर्पण केली.   
     ताटी उघडा ज्ञानेश्वरा या मुक्ताईच्या आर्त हाकेने  माऊलींनी बंद ताटीचा दरवाजा उघडत विश्व संदेश दिला. आदिशक्ती मुक्ताईने माऊलींना आर्त हाक देत बहिण भावाचे नाते किती अतूट आणि अजरामर असते हा प्रसंग रक्षाबंधनाच्या निमित्ताने वारंवार आठवला जातो. 
    प्रथा परंपरेप्रमाणे यंदाच्या वर्षीही आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान यांच्याकडून श्री तीर्थक्षेत्र आळंदी, त्रिंबकेश्वर आणि सासवड ,अशा तीनही ठिकाणीं बहिण भावाचे प्रेमाचे प्रतीक असलेली राखी भावंडांच्या चरणी अर्पण करण्यात आली, श्री मुक्ताबाई संस्थांन चे श्री पुरुषोत्तम वंजारी यांनी सहपरिवार माऊलींचे दर्शन घेत समाधीस रक्षा करणारी राखी प्रदान केली,
      यावेळी.श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ह भ प सागर महाराज लाहुडकर,संदीप पालवे उपस्थित होते त्याचबरोबर आळंदी देवस्थानचे वतीने ज्ञानोबारायांकडून आदिशक्ती मुक्ताईस साडी चोळी परंपरेप्रमाणे भेट दिल्याची माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!