सुनील भंडारे पाटील
हल्ली समाजामध्ये वेगवेगळे व्यवहार, उलाढाल करण्यासाठी, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अडी अडचणींना सामोरे जाण्यासाठी लोकांना कर्ज घेणे भाग पडते, परंतु हे कर्ज घेताना चुकीचा मार्ग अवलंबला तर मात्र त्या कुटुंबाची हेळसांड झाल्याशिवाय राहत नाही, मनशांती विस्कळीत होणे, कर्जापाई आत्महत्या असे प्रकार घडतात, कर्ज घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका निवडल्या तर फायदेशीर होते,
कोरोना महामारीनंतर लोकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची व बिकट झाली असून सद्यस्थितीत जीवन जगण्यासाठी लोकांची धडपड चालू आहे त्यासाठी नवीन कर्ज घेणे, अगोदरच्या कर्जाची परतफेड करणे यासाठी लोकांची तारेवरची कसरत चालू आहे, उत्पन्न सुमारे 10 टक्क्यांनी घसरले असून त्यात कर्जाचे हप्ते असतील तर भरायचे कुठून?, कर्ज घेण्यासाठी सहकारी वित्त संस्था, पतसंस्था यांचा भरगोस व्याजदर, अशा चुकीच्या पद्धतीने कर्ज घेतले तर त्या व्यक्तीचे कुटुंबाचा सत्यनाश होतो, पूर्णपणे शांती विस्कळीत होते, कित्येकांना तर कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करावी लागतात, भविष्यकाळात कर्ज घेताना या सर्व बाबींचा विचार करून कर्ज घ्यावे लागणार,
त्यासाठी जर राष्ट्रीयकृत बँकेची निवड केली तर व्यवसाय कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, शेती कर्ज, यासाठी व्याजदर देखील कमी असतो, शिवाय कर्ज थकल्यास वसुलीसाठी तगादा लावला जात नाही, नातेवाईकांना त्रास दिला जात नाही, वसुलीसाठी घरी चकरा मारल्या जात नाहीत, मानसिक त्रास, आत्महत्येस प्रवृत्त केले जात नाही, तातडीने प्रॉपर्टी जप्त केली जात नाही अथवा निलाव केला जात नाही,शिवाय शेवटचा पर्याय म्हणून वन टाइम सेटलमेंट ची सुविधा देखील दिली जाते, म्हणून आपले भवितव्य चांगले ठेवण्यासाठी कर्ज घेताना राष्ट्रीयकृत बँका सोईस्कर आहेत,