सुनील भंडारे पाटील
वाळकी रांजणगाव सांडस बेट परिसरात मुळा मुठा भीमा नद्यांच्या त्रिवेणी संगम झालेला भागामध्ये बाराही महिने शेतीला पाणी मुबलक असते, शेतीचा पोत, तसेच भिजट जमिनी झालेले असून तरी देखील शेतकरी संजय किसनराव थोरात यांनी सधन शेती करत एक एकर क्षेत्रामध्ये सुमारे 105 टन उसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर एक आदर्श तयार केला आहे,
थोरात यांनी सांगितले की, जून महिन्यात कांद्याचे पीक काढल्यानंतर शेतात पहिली आडवी उभी नांगरट करून शेणखत टाकले,काकरणी करून पुन्हा दुहेरी नांगरट केली, हंगामानुसार उसाच्या 86032 या वाणाची लागवड करून सेंद्रिय खताचा डोस दिला, काही दिवसांनी उसाची बांधणी केली, योग्य वेळी पाणी व सेंद्रिय खत देण्यात आले,
14 महिन्यात उसाची 45 ते 50 कांडी एवढी वाढ होऊन एकरी सुमारे 105 टनाचे उत्पादन मिळाले, थोरात यांनी घेतलेले या उसाच्या विक्रमी उत्पादनाची सर्वत्र चर्चा चालू असून शेतकरी उसाच्या प्लॉटमध्ये भेट देत आहेत, शिवाय थोरात यांचे कौतुक करत आहेत,