जालन्यातील लाठीहल्याचा सणसवाडी ग्रामस्थांकडून निषेध

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
       सणसवाडी (ता.शिरूर) ग्रामस्थांच्या वतीने  जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा बांधावांवर अमानुषपणे जो काठीहल्ला करण्यात आला त्याचा जाहीर निषेध करत याबाबतचे निवेदन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना सरपंच सुवर्णा रामदास दरेकर पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर व ग्रामस्थांनी दिले.सणसवाडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
   यावेळी सर्व ग्रामस्थ व व्यापारी यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणी,दूध, हॉस्पिटल,मेडिकल व इतर अत्यवश्यक सेवा सुरू ठेवण्यात येऊन नागरिकांची गैरसोय टाळण्यात आली.
      यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत अमानुष लाठीहल्ला, अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत हवेत गोळीबार केल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला असून कोपर्डी येथील भगिनीला न्याय मिळावा,मराठा आरक्षण मिळावे व मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेन्यात यावे अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
       यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर उद्योगनगरी सणसवाडी गावच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडेचे विद्यमान, माजी सरपंच संगीता हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य सागर दरेकर दगडू  दरेकर, निलेश दरेकर,  नवनाथ हरगुडे, विजय दरेकर, विदयाधर  दरेकर, ग्रामपंचायत सदस्य तनुजा दरेकर, माजी सरपंच सुरेश हरगुडे, सुभाष दरेकर, बाळकृष्ण दरेकर मारुती दरेकर नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे,शरद खरात पोलीस पाटील दत्ता माने,शिवाजी हरगुडे, शुभ संघटना  नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे, आणि प्रा .अनिल गोटे   व इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!