कान्हूर मेसाई ज्ञानेश्वर मिडगुले
स्वातंत्र्य प्राप्तीपासून दुर्लक्षीत अशा कान्हूर मेसाईं भागातील थोड्याशा उंचसखल १२ गावच्या पाणी प्रश्नासाठी रविवार १० सप्टे रोजी मेसाई मंदिर प्रांगणात बैठकीचे आयोजन असल्याचे माजी सरपंच दादासो खर्डे व कान्हूर मेसाई ग्रामस्थांनी सांगीतले .
शिरूर तालुक्यातील १२ गावांच्या शेतीच्या पाणी प्रश्नावर आंदोलन करणे संदर्भात मार्गदर्शन मिळावे यासाठी आज ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे भेट घेऊन चर्चा केली आणि आशीर्वाद घेण्यात आला ...या लढ्याला मी स्वतः येऊन मदत करील असे ही आण्णा म्हणाले.....
कान्हूर मेसाई शिवाराच्या दोन्ही बाजूंनी डिंभा व चासकमानचे मुख्य कालव्याचे पाट गेले असून त्यांमधून पाबळ , धामारी, खैरेनगर, मांदळवाडी, खैरवाडी, घोलपवाडी , कान्हूर मेसाई, शास्ताबाद, चिंचोली, फलकेवाडी , मिडगुलवाडी, हिवरे आदी डझनभर गावांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी पुरवीणे सहजशक्य आहे पण या भागचे लोकप्रतिधींनी नेहमीच दुर्लक्ष केले . डिंभाचारीपासून फक्त४ किलोमीटर जंजळचे डोंगरा शेजारी पाणी चढविण्यास ५० मिटरचीही उंची नाही व चासकमानही सरळ १0 किलोमिटरचे टप्यात आहे . तिकडे पुरंदर उपसा सिंचन योजनेची उंची याचे १०० पट आहे आणी उजनीतून तर 30किलोमिटरचा बोगदा पाडून पाणी नेले जातेय, मग या पाबळ कान्हूरभागासाठीच दुजाभाव का? असा रास्त सवाल आहे