सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील, वरुडे गावातील आनंदा शंकर चौधरी यांची पत्नी, वत्सलाबाई यांचे दिनांक २८.०८.२०२३ रोजी दुःखद निधन झाले तसेच बाजीराव गोविंद चौधरी यांची पत्नी, चंद्रभागा यांचे दिनांक २९.०८.२०२३ रोजी निधन झाले. चौधरी पाटील कुटुंबातील या दोन्हीही आदर्श गृहिणी होत्या. अंत्यविधीनंतर सावडण्याचा कार्यक्रम झाल्यावर, त्यांच्या अस्थी व रक्षाविसर्जन कोणत्याही नदीत किंवा पाण्यात न करता शेतात खड्डे खोदून त्यामध्ये वृक्षारोपण केले.
या वृक्षांचे संवर्धनातून व दररोज वृक्षांचे दर्शनातून मृत व्यक्तींच्या स्मृती वेगळ्या तऱ्हेने जपल्या जाणार आहेत. याबाबत पर्यावरण जागर प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांनी पर्यावरण विषयक महत्त्व पटवून देताना ही संकल्पना वरुडेकर ग्रामस्थांना पटवून दिली होती.
पर्यावरण जागर प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) या संस्थेचे कार्यकर्ते, एकनाथराव वाळुंज, सरपंच, भालचंद्र रोडे, उपसरपंच दिलीप चौधरी, निवृत्त डी. वाय. एस. पी., भीमराज मंडले, निवृत्त कर्नल उत्तम चौधरी, दशरथ चौधरी, नाथा चौधरी, छबन चौधरी, दत्तात्रय चौधरी, सुनील तांबे आणि चौधरी कुटुंब यांचे नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. वरुडे ग्रामस्थानी हा उपक्रम ,पर्यावरण रक्षनास पूरक असल्याने तो भविष्यात चालू ठेवण्याचा संकल्प केलेला आहे.चौधरी कुटुंबीयांनी, या दुःखी प्रसंगातही, पर्यावरणाचे भान राखून केलेल्या, उपक्रमाबद्दल पर्यावरण जागर प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून "धन्यवाद पत्र" प्रदान करण्यात आले.