सुनील भंडारे पाटील
सद्यस्थितीत सहकारी बँका तसेच पतसंस्था ही समाजाला लागलेली एक कीड असून संचालकांच्या हितसंबंधातून प्रत्येक संचालकाची कोट्यावधी रुपयांच्या पटीत असणारी ठेव समाजामध्ये नियम सोडून व्याज आकारणी करत कर्जदारांचा शोध घेत वाटप केलेल्या कर्जातून भरमसाठ व्याज दिवसा ढवळ्या राजरोसपणे वसूल केले जात आहे, समाजात खाजगी सावकार की बंद झाली असली तरी आता हे नवीन फॅड सावकारकीचे तयार झाले आहे, सहकारी बँका तसेच पतसंस्था यांच्या संचालकांच्या किती ठेवी जमा आहेत याची चौकशी करण्याची मागणी नागरिक वारंवार करत आहेत,
चतुर संचालक आपल्या घरातील वेगवेगळ्या नात्यामधील अशा अनेक व्यक्तींच्या नावावर कोट्यावधी रुपयांची उलढाल सहकारी बँका तसेच पतसंस्था यांच्या माध्यमातून करत असून सहकारी बँका तसेच पतसंस्था यावर काम करणारे संचालक मंडळ यामधील प्रत्येक संचालकाच्या नावाने तसेच त्याच्या नातेवाईकाच्या नावाने किती मुदत ठेवा आहे याविषयी अर्थ खाते तसेच राज्य व केंद्र शासनाने कधीच विचार केला नाही, हजारो वर्षे समाजात चाललेली खाजगी सावकारी केंद्र सरकारने एका झटक्यात बंद केली, परंतु सहकारी बँका तसेच पतसंस्था यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये ठेव असणाऱ्या संचालकाची कधीच कोणी चौकशी केली नाही, ही दुर्दैवाची बाब असून यांचा हिशोब देखील कोणी पाहिला नाही,
दिवसाढवळ्या लबाडी चोरी करणाऱ्या या सहकारी वित्त संस्था तसेच पतसंस्था यांनी चालवलेली समाजामधील लुटालुट कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांमधून वारंवार विचारला जात आहे,तसेच संचालकांच्या कोट्यावधी रूपांच्या निधीवर चालणारी ही सावकारकी अर्थ खाते आणि तसेच राज्य शासन व केंद्र शासन कधी थांबवणार अशी मागणी नागरिकांकडून होत आहे,