संजय पाचंगे यांची भाजपा उद्योग आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Bharari News
0
संजय पाचंगे यांच्या भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी च्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी  निवडीने शिरुर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण... 
सुनील भंडारे पाटील 
       शिरूर तालुक्यातील एक अभ्यासु, धाडसी निर्णय घेणारे, एकेकाळी पद्मभूषण थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचे शिष्य राहीलेले , अभ्यासपूर्ण आंदोलनाने शिरुर तालुक्यासह संपुर्ण राज्याला टोल मुक्तीचा मंत्र देणारे संजय पाचंगे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी च्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 
      यापुर्वी त्यांनी भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण च्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वी पणे सांभाळली होती .
शिरूर तालुक्यातील राजकारणात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करुन प्रशासनावर जबरदस्त पकड ठेवुन सर्व सामान्य नागरिकांना आपला हक्काचा माणूस म्हणून जनता त्यांच्याकडे पहात आहे.
      राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांच्याबाबत उघडपणे नव्हे, खाजगीत सुद्धा त्यांच्या विरोधात बोलण्याचे कोणी धाडस करीत नसताना संजय पाचंगे यांनी जिल्हाध्यक्ष असताना आमदार अशोक पवारांच्यावरच थेट पुराव्यानिशी आरोप करत भ्रष्टाचारावर आक्रमकपणे भुमिका घेत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा, शिरुर एसटी बस स्थानक बी ओ टी, पंचायत समिती बांधकाम भ्रष्टाचार, कोवीड काळातील आमदार निधीतून कोवीड उपचारासाठी व्हेंटीलेटर व साहित्य भ्रष्टाचार याबाबत पवारांना सळो की पळो करून सोडले होते. 
       खास करुन व्यंकटेश क्रुपा शुगर मिल्स च्या चौकश्या लावुन पवारांना त्यांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. महत्वाचे म्हणजे आजपर्यंत आमदार अशोक पवार यांनी संजय पाचंगे यांच्याबाबत मौन बाळगले आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  शिरूर - हवेली विधानसभेचे ते प्रमुख दावेदार म्हणून जनता त्यांच्याकडे पहात असुन बदलत्या राजकीय वातावरणामुळे
    सध्या तालुक्यातील राजकारणात मरगळ आली असताना संजय पाचंगे यांच्यावर विश्वास टाकत पक्षाने त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली असल्याने एक खंबीर नेतृत्व मिळाल्याने तालुक्यातील भाजपा च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.तसेच आगामी काळात शिरुर - हवेली साठी अशोक पवार विरुद्ध संजय पाचंगे अशीच राजकीय लढाई होऊ शकते याकडे  सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!