सुनील भंडारे पाटील
रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी आष्टापुर (तालुका हवेली) येथील रामदास पाटील बुवा कोतवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे,
शेतकरी कुटुंबातील, कायम शेतीसी निगडित असणारे तसेच शेतीमध्ये स्वतः घाम गाळणारे प्रगतशील शेतकरी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे शेतकरी रामदास कोतवाल यांनी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न केलेले असून हवेली तालुक्यातील महत्त्वाचा मुद्दा यशवंत सहकारी साखर कारखाना नवीन संचालक मंडळाच्या निवडणुक प्रक्रियेपर्यंत मार्गी लावला आहे, त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप लढा दिला आहे,
या निवडीनंतर रामदास कोतवाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या अनेक अडीअडचणी शासन दरबारी न्याय मिळवण्यासाठी यापुढे देखील लढा देणारा असून शेतकऱ्यांची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच गेल्या अनेक वर्षांपासून चाललेले रयत शेतकरी संघटना अजून मजबूत करणार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र, संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी नुकतेच दिले आहे,