सुनिल भंडारे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज खराडी पुणे येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची लाखोंच्या पटीत मराठा बांधवांच्या समवेत जोरदार सभा आज पार पडली, या सभेसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील मराठा बांधव उपस्थित होते,
एकच मिशन मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, अशा जोरदार घोषणाबाजीत मनोज जरांगे पाटील यांचे आगमन झाले, खराडी पुणे येथील महालक्ष्मी लॉन्स कार्यालयात झालेली या सभेसाठी पुणे पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, पुणे नगर रोड तसेच सोलापूर रोड या मार्गावरील वाहतुकीचे अतिशय चांगले नियोजन केले होते,
मराठा समाज व कुणबी एकच असल्याचे जुने शासकीय पुरावे शासनाने नेमलेल्या समितीला सापडले आहेत, गेल्या 75 वर्षात दुसऱ्या समाज बांधवांना आरक्षण देताना अडथळा आणला नाही, किंवा सरकारला अडचण निर्माण केली नाही, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, मराठा समाजाची 58 मोर्चे झाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सर्व मोर्चे यशस्वी केले, याचे भान राज्य सरकारने ठेवावे, मराठा समाज सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत आहे, जास्त अभ्यास आमच्या मराठी मुलांनी करायचा, शाळेत जास्त फी भरायची,आम्ही महाराष्ट्रात राहत नाही का? दिवसेंदिवस शेती कमी होत चालली आहे, बेरोजगारी वाढत चालली असून आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नाही, त्यामुळे आमच्या हक्काचे आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असे मत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले,
आळंदी येथे पहाटे झालेल्या सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी सकाळी दर्शन घेतले, त्यानंतर दुपारी खराडी पुणे येथे जोरदार सभा झाली, आळंदीपासून लाखोच्या संख्येने मराठा समाजातील बांधव मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर प्रवासात उपस्थित होते,