राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांच्या सहकारी बँका,पतसंस्था

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
               समाजामध्ये अर्थ क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सहकारी तसेच पतसंस्था ह्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या असून चेअरमन त्याचप्रमाणे संचालक मंडळ वर असणारे सर्व संचालक हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षासाठी काम करत आहेत,
          माणसाच्या जीवनामध्ये पैशाचे महत्व अनन्यसाधारण आहे, समाजामध्ये चांगले जीवन मन जगायचे असेल, नेतृत्व, प्रभावी छाप यासाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे पैसा, वीस वर्षांपूर्वी पैशाचे महत्व आणि आज असलेले पैशाचे महत्व यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, पैसे कमवण्यासाठी लोक काय करतील सांगू शकत नाही, संचालक मंडळ तयार करून त्याच संचालकांच्या मधून कोट्यवधींचा निधी तयार करून अशा स्वरूपाच्या वित्त संस्था तयार केल्या जातात, हेच पैसे कर्जदारांना कर्जाच्या स्वरूपात वाटप करून त्यांच्याकडून भरमसाठ व्याज उकळले जाते, दिवसाढवळ्या पैसा कमावण्याचा राजकीय पदाधिकाऱ्यांना सहकारी बँका व पतसंस्था हा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे,
            वास्तविकता आपल्या देशामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया ने राष्ट्रीय बँकांना ताकद देऊन आकर्षक पद्धतीने जनतेला वित्त पुरवठा केला पाहिजे, त्यामुळे समाजाची प्रगती होईल, परंतु अनेक अडचणीमुळे लोकांना नाईलाजस्तव अशा इतर वित्त संस्थांकडे वळावे लागते आणि तिथेच त्यांची फसगत होते, राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांना भरघोस पैसा कमवण्यासाठी अशा वित्त संस्था हा एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झाला आहे, यावर कुठेतरी आरबीआयने कडक  नियंत्रण आणले पाहिजे अशी जोरदार चर्चा सध्या नागरिकांमध्ये चालू आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!