कारेगाव परिसरातील लोकांची फसवणुक करून पलायन केलेल्या सोनारास परराज्यातून अटक, ५५ लाख रुपयांचे ९१ तोळे सोन्याचे दागीने रांजणगाव पोलीसांनी केले जप्त.

Bharari News
0
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
               शंभरहून अधिक नागरिकांची सोने खरेदी-विक्रीत झालेली फसवणूक करुन पसार झालेला परप्रातींय सोनार व नागरीकांनी तक्रार केल्यावर फरार सोनाराच्या बंद असलेल्या मोबाईलमुळे सदर आरोपीचा तपास कसा लावायचा असे आव्हान असताना ही रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी परप्रातींय सोनाराला गुजरात येथुन ताब्यात घेऊन कायदेशीर बाबींची पुर्तता करुन नागरिकांना सोन्याचा ऐवज परत केला आहे. ही बाब पोलीस व नागरिकांसाठी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी केले.
           रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सोनाराने फसवणूक केलेल्या नागरिकांना सोने व ऐवज परत करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.या प्रसंगी  ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधिक्षक   मितेश गट्टे ,  उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी , पोलीस निरीक्षक महेश ढवाण , संजय जगताप , प्रमोद क्षिरसागर ,  पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे ,   निळकंठ तिडके , अनिल मोरडे , शुभांगी कुटे , शिवाजी मुंढे , 
कारेगावच्या सरपंच निर्मला नवले , महिला दक्षता समिती अध्यक्षा सुलभा नवले , मनिषा नवले आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        या बाबत मनिष रामचंद्र नवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनानुसार व पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या सुचनेनुसार तपास सुरु केला असता आरोपी सोनार हा त्याच्या कुटूंबियांसह त्याच्या मुळगावी राजस्थामध्ये देखील राहण्यास नसल्याने आणि त्याने मोबाईल सुद्धा बंद करुन ठेवल्याने या आरोपीचा शोध घेवुन नागरीकांना त्यांचे दागीने परत मिळवुन देण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. रांजणगाव येथील तपास पथक सदर आरोपी बाबत गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत होते. 
         रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी सदर आरोपीचा (कटोसन, ता. कडी, जि. अहमदाबाद, राज्य गुजरात) येथे जावुन शोध घेतला. त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असतांना त्यांना मिळालेल्या एका कपड्याच्या दुकानाच्या उदघाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर आरोपी सोनार प्रताप परमार याचे नाव आणि नवीन मोबाईल नंबर मिळुन आला. त्याच्या आधारे सुहास रोकडे यांनी सदर दुकानामध्ये नवीन कपडे खरेदीच्या बहाना करुन जावुन माहिती काढली असता सदरचे कपड्याचे दुकान हे आरोपी प्रताप परमार याचेच असल्याची खात्री झाली.
           त्यानंतर सुहास रोकडे यांनी कपडे खरेदी झाल्यानंतर दुकानाच्या शेठला भेटायचे आहे असे सांगत दुकान मालकाला बोलवुन घेत ताब्यात घेतले असता सदर दुकानमालक हा आरोपी प्रताप परमार उर्फ नरपतसिंह मोहब्बतसिंह रजपुत (वय ४०) मुळ रा. चामुंडेरी, ता. जि. पाली, राज्य राजस्थान हाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपास पथकाने आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन वरील गुन्हयामध्ये (दि १२) डिसेंबर  रोजी अटक केली. त्यानंतर आरोपीला शिरुर न्यायालयात हजर केले असता. त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्या दरम्यान आरोपीकडे तपास केला असता आरोपी प्रताप परमार याने फिर्यादीसह इतर १५० ते १६० नागरीकांची एकुण १०० तोळे सोन्याच्या दागीन्यांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
          आरोपी प्रताप परमार याने नागरीकांकडुन घेतलेले सोन्याचे दागीने हे कारेगाव येथील 'ओंकारबाबा ग्रामीण निधी लि.' या पतसंस्थेत तसेच काही दागीने हे त्याचा ज्वेलर्स दुकानाचा जुना भागीदार कुमार चंद्रकांत ओव्हाळ (रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. रांजणगाव पोलिसांनी आत्तापर्यंत आरोपी प्रताप परमार याच्याकडुन एकुण ५४ लाख ६९ हजार रुपये किंमतीचे ९१ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने या गुन्हयाच्या तपासामध्ये जप्त केले आहेत. तसेच सदर आरोपीस (दि. २०) डिसेंबर पासुन न्यायालयीन कोठडी रिमांड मंजुर करण्यात आलेली आहे.
          सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी  चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, माणिक काळकुटे, तेजस रासकर यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सुहास रोकडे हे करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!