आळंदी प्रतिनिधी
माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा आळंदीत ५ ते १२ डिसेम्बर २०२३ या कालावधीत साजरा होत आहे. या निमित्त वारकरी दिंड्यांची व अत्यावश्यक सेवेच्या वाहनाना केवळ प्रवेश दिला जाणार आहे. या शिवाय इतर वाहनांना तीर्थक्षेत्र आळंदीत प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी यात्रेच्या काळात इतर वाहनांनी जाहीर केलेल्या मार्गावरील पर्यायी मार्गावरून रहदारी करावी यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे वतीने सूचना देत निर्गमित करण्यात आले आहेत.
शाखेचे पोलीस उप-आयुक्त बापू बांगर यांनी तात्पुरत्या स्वरूपात आदेश दिले आहेत.यामध्ये १ ) मोशी चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रेवश बंदी. पर्यायी मार्ग - जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्ग, चौविसावाडी / विश्रांतवाडी / भोसरी २ ) भारतमाता चौक, मोशी येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग - जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे चोविसावाडी/ विश्रांतवाडी/ भोसरी. भोसरी चौक-मॅगझीनचौक मार्गे विश्रांतवाडी. मोशी-चाकण ते शिक्रापूर मार्गे.३) चिंबळीफाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग - जय गणेश चौक, अलंकापुरम चौक मार्गे चोविसावाडी/विश्रांतवाडी / भोसरी. भोसरी चौक मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी.
४) आळंदी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्गा -जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे चोविसावाडी / विश्रांतवाडी / भोसरी. भोसरी चौक मॅगझीन चौक मार्गे विश्रांतवाडी.
५) चाकण-वडगांव घेणंद मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग - कोयाळी कमान, कोयळी-मरकळगाव मार्गे पुणे
६) मरकळमार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग - धानोरे फाटा - चऱ्होली फाटा मार्गे भोसरी-विश्रांतवाडी.
७) पुणे-दिघी मॅगझीन चोक मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग - भोसरी मार्गे-मोशी-चाकण. अलंकापुरम - जयगणेश साम्राज्य चौक मार्गे-चाकण. चऱ्होली फाटा - धानोरीफाटा मार्गे - मरकळ- पुणे या प्रमाणे राहील.
आळंदी यात्रेत अशी राहील पार्किंगची सुविधा
१ ) वडगांवकडून येणाऱ्या वाहनांसाठी चांगदेव महाराज विश्रांतवडाजवळी मोकळी जागा. वडगाव रोडवरील नगरपरिषद पार्किंग.
२) चाकण आळंदी फाट्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी इंद्रायणी हाॅस्पिटल समोर, आळंदी तसेच चिंबळी फाट्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी बोपदेव चौकाजवळ मुंगसे पार्किंग, देहूगाव, मोशी, हवालदार वस्ती फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी वहिले पार्किंग व ज्ञानविलास काॅलेज डुडुळगाव, कचरे हाॅस्पिटल समोर तसेच विविध ठिकाणी शुल्क भरून पार्किंगची व्यवस्था देखील उपलब्द राहणार आहे. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशी वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक वाहतूक एसटी बस / पीएमपीएमएल साठीची ठिकाणे यात सर्व ठिकाणी जाण्यासाठी योगीराज चौक येथील एसटी बसस्टॅड, ( फक्त एसटी बस), देहूकडे जाण्यासाठी डुडुळगाव जकात नाका येथे एसटी आणि पीएमपी बस स्टॅंड, पुण्याकडे जाण्यासाठी चऱ्होली फाटा येथे एसटीबस आणि पीएमपी स्टॅंड येथून व्यवस्था करण्यात आली आहे.
आळंदी आणि दिघी पोलीस स्टेशन तसेच आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखा यांचे माध्यमातून तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली सुरक्षित सुरळीत वाहतूक आणि यात्रेत भाविक, नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे. यात्रेत पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.