सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) येथील रायझिंग स्टार स्कूलबस चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यालगत झाडावर आदळली, यामध्ये विद्यार्थी किरकोळ जखमी झाली असून एक 65 वर्षीय वृद्ध महिला रस्त्यावर चालताना या बसने धडक दिल्याने गंभीर जखमी झाली आहे सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत, शाळेकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न,
संबंधित बस रायझिंग स्टार स्कूल भावडी रोड वाघोली या ठिकाणावरून विद्यार्थी घरी सोडण्यासाठी चालली असताना केसनंद वाडे बोल्हाई रस्त्यावर, वाडे बोल्हाई हद्दीमध्ये ढोरे वस्तीवर, स्कूल बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने, प्रथम एका वृद्ध महिलेला धडक देऊन ही बस रस्त्या शेजारील झाडावर आदळली, यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाली असून अपघात ग्रस्त वृद्ध महिला व विद्यार्थी यांच्यावर खाजगी रुग्णांना यात उपचार चालू आहेत, ही घटना काल सोमवार ता 4 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली, या घटनेने परिसरात खळबळ उडाली, घटनास्थळी स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य पोहोचवले,
या घटनेमुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरा लगत अशी घटना घडणे शरमेची बाब आहे, चालकाच्या तसेच रायझिंग स्टार स्कूलच्या हलगर्जीपणा मुळे ही घटना घडली असून विद्यार्थी पालकांकडून तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त होत आहे, शिवाय रायझिंग स्टार स्कूलच्या वतीने, प्रकरण दडपण्यासाठी किंवा लोकांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून रात्री स्कूल बस वरील शाळेच्या नावाचे स्टिकर काढण्यात आले आहे, पुणे जिल्हा परिषद शैक्षणिक खात्याकडून अशा शाळांवर तीव्र कारवाई करण्याची गरज आहे,
या घटने संदर्भात लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत,