संपादक सुनील भंडारे पाटील
आजपर्यंतच्या इतिहासात असा कुठलाच इतिहास घडला नाही की त्याची दखल घ्यावी असा इतिहास आज मराठ्यांचा नवीन मराठा संघर्ष योद्धा म्हणून *आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील* हे आज *जगासमोर* आले आणि सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास हा खरच उल्लेखनीय आणि *जबरदस्त इच्छाशक्तीच्या* जोरावर शिक्षण असो अथवा नसो, फक्त *जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर प्रामाणिकपणे* आपण आपलं यश संपादन करू शकतो यात तीळ मात्र शंका नाही, असेच त्यांनी दाखवून दिले प्रथमता त्यांच्या या जबरदस्त मोठ्या यशाला हार्दिक हार्दिक अभिनंदन..........
मी आज आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस झालं मी लेख लिहायचा राखून ठेवला होता, मनोज दादांवर लेख लिहावा लिहावा परंतु थोडं थांबावं असंच वाटायचं का कुणास ठाऊक,......... मूळचे बीडचे असलेले एका खेड्यातल्या गरीब मराठा कुटुंबातील जन्मलेल्या जरांगे पाटलाच्या कुटुंबात मनोज नावाच्या एका मुलान जन्म घेतला आणि शिक्षण ही जेमतेमच झाल असाव पण प्रामाणिकपणे मराठा आरक्षण लढ्याला गेली 14-15 वर्ष सातत्याने मनापासून प्रयत्न केले ते आज मनोजदादा पाटील, महाराष्ट्रातील जालन्याच्या अंबड तालुक्यातील, अंतरवली सराटी या छोट्याशा गावात जन्म झाला, *(त्यांच्या शिक्षणाची पूर्ण माहिती नाही)* घरात कोणताही सामाजिक वारसा नाही,कोणताही राजकीय वारसा नाही, घरची परिस्थिती बेताचीच, घरात जेमतेम चार एकर शेती त्यात दोन हिस्से, त्यातली ही समाजासाठी दोन एकर शेती विकून समाजाच्या आरक्षणासाठी लागणारा पैसा उभा केला आणि इतके वर्ष आरक्षणाचा लढा चालू ठेवला, घरावर साधा पत्रा सुद्धा नाही, बेंगलोरी कौल आहेत, तेही भंगारत कोण विकत घेत नाही, असा फाटक्या झोळीचा माणूस, *शरीराने सड पातळ बांधा पण विचाराने मात्र चांगल्या चांगल्याना ही पाणी पाजलं*,.......... हे याची देही याची डोळा आम्ही सर्वांनी पाहिलंच, आज त्यांच्या *आरक्षणामध्ये सरपंचापासून ते देशाचे 2 मुख्य न्यायाधीश यांच्या पासून सर्व आमदार,खासदार, मंत्री, मुख्यमंत्री हे त्यांच्या पाया पडत होते,......... आरक्षण मनोज दादांच उन्हात चालू होतं आणि घाम मात्र AC बसलेल्या मंत्र्यांना आमदारांना, फुटला होता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती कुठ पळाव ते सुचत नव्हतं, (कारण पहिलेच गुजरात, गुवाहाटी, गोवा, करून आलेली मंडळी) काय बोलावं ते कळत नव्हतं, सारखं सारखं खोलीत चला,बंद दार आड चर्चा करू, पण हा पट्ट्या इमानदार जे काय बोलायचं ते मायबाप जनतेसमोरच बोला, खुली चर्चेवरच तोडगा काढण्यावर ठाम राहिले, जिकडं बघावं तिकड भगवं वादळ, कारण सगळ्यांना माहिती होतं या भगव्या वादळानं दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची सर्व सत्ता मोडून त्यांच्या छतावर भगवा डौलाने फडकवला होता त्या छत्रपतींच्या अनुयायांचे हे मावळे आहेत हे एक दिवस आपल्यालाही गाडणारच ही धडकी त्यांच्या छातीत भरलेली होती.......
एवढा ध्येयवेढा आणि आपल्या समाजासाठी झटणारा व्यक्ती आजवरच्या इतिहासात कोणीच पाहिला नसेल, अंतरवाली मध्ये जी सभा झाली ती सर्वात मोठी पहिली सभा एक कोटीच्या वरती आणि त्यानंतर सर्वांच सभांचा धडाका सुरू झाला,तो कोटींच्या वरती गेला, मला बरेच दिवस झाले एक सांगायचं होतं का एक मराठा लाख मराठा ही म्हण विसरून जाऊन आता नव्याने मराठ्यांनी एक मराठा एक कोटी मराठा ही म्हण सुरू करावी आज गोदापट्ट्यातला एकही मनुष्य, लहान बाळापासून तर वयस्कर वयोवृद्धा पर्यंत एकही मराठा घरात नव्हता, नव्हे तो त्याच्या, ध्येयाकडेच डोळे लावून बसला होता, उद्याचा सूर्य उगवेल आणि आम्हाला आरक्षण मिळेल आणि आमच्या मराठ्यांची पोर आत्महत्या करण्याची थांबतील या ध्येय वेड्या गोष्टीन त्यांना वेड लावून सोडलं होतं,......
जसं जसं आरक्षणाला धार लागत गेली तस तसं संपूर्ण महाराष्ट्र आरक्षणाच्या कवेत येऊन सामावला आणि हजारोंच्या संख्येने जमलेला मराठा, लाख होत गेला आणि लाखोतला मराठा कोटीत कधी एकवटला संत्रे-मंत्र्यांना सुद्धा कळलं नाही, मग काय सरकार मनोज पाटलांच्या पाठीमागे लागलं त्यांनी संपूर्ण इतिहास काढायचा ठरवलं मनोज त्यांच्या मागे ईडी कशी लावता येईल, त्यांना कशाप्रकारे अडवता येईल, त्यांच्यावर कशा खोट्या केसेस करता येईल पण मॅनेज होईल तो म्हणून दादा कसला आणि मग मॅनेज होत नाही म्हटल्यावर, त्यांनी अंतरवली मध्ये आरक्षण सभा चालू असताना पोलिसांना सांगून मराठ्यांच्या आया-बहिणींवरती लाठी चार्ज करून त्यांना रक्त भांबाळ करून त्यांचे रक्त सांडण्यात आलं, मराठ्यांच्या पोरांवर गोळ्या झाडल्या अक्षरशः असं वाटू लागलं होतं का इंग्रजांची जुलमी सत्ता आणि मोगलाई माजली की काय असंच भासू वाटू लागलं होतं, एवढी कृरता आजपर्यंत आरक्षणासंदर्भात कधीही कुठे घडली नव्हती ज्याचा कळस गृहमंत्री फडणवीस सरकारने केला, आणि याचे सर्वस्वी जबाबदार फडणवीस होते, गेंड्याच्या कातडीचे सरकार हे गरिबांना आणि जनतेला नीट जगू देणार नाही हे यातून दिसून आलं,आज त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर पेशवाईंनी सुद्धा सूडबुद्धीने पूर्वीपासून बहुसंख्यंवरती अशाच पद्धतीने बामणी गावाकडून बहुसंख्याकांना त्रास देण्याचा त्यांचा रक्त सांडण्याचा आणि गद्दारी करून संपवण्याचा डाव आखला होता परंतु या वेळेस गाफील न राहता सावधगिरीने पावला टाकत जरांगे पाटलांनी तो डाव हाणून पाडला..........
अहो आज मनोज दादांच्या नेतृत्वात मराठ्यांच्या पोरांनी ऊन वारा पाऊस वादळ कशाचेही परवा न करता 24 तास मैदानात तळ ठोकून होते, इतिहासात नोंद आहे गद्दार फोडल्याशिवाय युद्ध जिंकता येत नाही परंतु या वेळेस आरक्षणामधीलच मराठ्यांमधले काही फुटलेले गद्दार मराठा त्यापैकी नारायण राणे, त्याची दोन टील्ली पिल्ली, रामदास कदम, नंतर अजित पवार, अजूनही बरेच नाव आहेत यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आणि मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही हे वारंवार सांगून अपमान केला, पण या नेत्यांची गद्दारी कुठेच फळाला आली नाही, भविष्यात त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल ही,परंतु पडत्या काळात अशांनी....... काय होत नाही तर आपली तोंड गप्प ठेवावेत......हे साधं गणितही त्यांना कळालं नाही,................ आणि दुसरीकडे तो ह****** सरकारी वकील सदागुण उधळे (गुणरत्न सदावर्ते) याने मराठा आरक्षण विरोधात याचिका टाकली आणि आरक्षण विरोधात आवाहन उभ केलं, ज्याला मराठ्यांच्या पोरांनी वेळीच ठोकून काढलं,..........
परंतु हे सर्व असतानाही मनोज दादांनी,रणनीती,डावपेच सर्वच्या सर्व गनिमी काव्याने केले आणि एकेक आरक्षणाच्या सभा लाखोंनी करोडोनी होत गेल्या, त्याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षी आहे, आणि सरकारच्या पायाखालची जमीन सरकली, सर्व मराठ्यांची ताकत आणि पाठबळ बघून मनोजदादा या तरुणाच्या मनात समाजाचे काम करण्याच वेड मात्र नसानसात प्रचंड ताकतीने भरल गेल, दिवसाचे 18 तास काम केल्यानंतर हे दुसऱ्या दिवशी तोच उत्साह, तोच जोश, पुन्हा जोशाने उठायचे पुन्हा नव्याने आखणी करून पुन्हा आरक्षणाची बांधणी करायची हा क्रम कधीच बंद पडू दिला नाही आण थांबू दिला नाही, आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांच्या 55 लाख नोंदणी सापडल्या,............ छत्रपतींच्या विचाराने प्रेरित होऊन, आणि त्यांच्या दोन्ही वारसांना सोबत घेऊन त्यांच्या विचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न चालूच ठेवला,.............
मराठा समाजाकडे शेती असून ती पिकत नाही पिकली तर तिला भाव नाही, तिच्यावर आसमानी आणि सुलतानी संकट चारूबाजूंनी घेरलेलच असते, इकडे आड तिकडे घेतलेल्या पिकाचं या विचाराने मराठ्याची पोर दिवसेंदिवस आत्महत्या करतात.... त्या आत्महत्याच प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं उन्हात काबाड कष्ट करून शेतीतल माल पिकवायच आणि बाजारात कवडीमोल भावाने विकायच, शेतीसाठी लागणारी बी बियाणे, औषध, डिझेल शेतात आलेला मजूर त्याचे मजुरी, ट्रान्सपोर्टेशन,बारदान, पाणी, स्वतःचा बैल असेल तर ठीक नाहीतर दुसऱ्याकडून घेणे अशा एक ना अनेक संकटांवर मात करून शेतकरी शेती पिकवतो आण..........
हे बसलेले बाजारात बाजार बुनगे शेतकऱ्याचा बाजार ऊटेल अशाच भावात विकत घेऊन शेतकऱ्याचा बाजार उठवणारे हरामी खरेदी-विक्री करणारे व्यापारी अडतदार आणि शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठरवणारे हरामी नेते..........
या माणसांन कधी अन्न वेळेवर घेतलं नाही, जे भेटेल ते खाल्लं, चटणी भाकरी असू द्या पिठलं भाकरी असू द्या स्वतःची, घराची कधीही काळजी केली नाही, घरावर तुळशी पत्र ठेवून फक्त आणि फक्त समाजासाठी झटत राहिला, मनोज दादांनी आत्ताच्या अलीकडच्या काळात तीनदा उपोषण केलं पहिलं नऊ दिवसाचं दुसरं तेरा दिवसाच आणि तिसरा रेकॉर्ड ब्रेक 19 दिवसाच,
डॉक्टरांचा सल्ला विचारल्यानंतर अशी उपोषण केल्यानंतर मनुष्याच्या बॉडी मधलं पाणी कमी होऊन जातं, मेंदू ड्राय होतो हृदयापर्यंत रक्त पोहोचत नाही, शरीरातील रक्ताच प्रमाण कमी होऊन गुठळ्या तयार होतात, आणि त्या अवस्थेमध्ये मनुष्याचा मृत्यूही होऊ शकतो, परंतु एवढं असूनही या माणसाच्या अंगात कोणती दैवी शक्ती होती कोणास ठाऊक पण वजन कमी होऊन किंवा अजून काहीतरी जीवघेणं प्रकार न होता उलट त्यांचं वजन वाढलं गेलं हेच आश्चर्याची गोष्ट, मराठ्यांच्या आया बहिणींनी विनंती केल्यानंतर विनंतीला मान देऊन थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पुन्हा जोशाने आरक्षणाला सुरुवात केली,